माळशेज घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली, वाहतूक ठप्प
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 06:03 PM (IST)
मुरबाड: माळशेज घाटात पुन्हा बोगद्याजवळ दरड कोसळली असून नगर, मंचर, नारायणगाव आणि जुन्नरवरून होणारी वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. पावसामुळे पुन्हा त्याच दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्यामुळे पुणे आणि नगरमधून मुंबईकडे येणाऱ्या भाजीपाला आणि जीवनाआवश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने घाटात अडकली आहेत. दरम्यान, पावसाचा जोर जास्त असल्यानं दरड हटवणं शक्य नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे उद्या सकाळीच दरड हटवण्याचा कामाला सुरुवात होईल. काही दिवसांपूर्वीच दरड कोसळण्याची घटना घडली होती.