Pomegranate Price Hike : अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका डाळिंब बागांना बसला आहे. यामुळे बाजारात अत्यंत कमी प्रमाणात डाळिंबाची आवक सुरु आहे. तरी, आज पंढरपूर बाजारात डाळिंबाला सरासरी 70 रुपये आणि जास्तीत जास्त 160 रुपये इतका भाव मिळत आहे. यंदा अवकाळीने डाळिंबाच्या माळावर मोठा परिणाम झालाय. सध्या दिल्लीत गुजराती डाळिंबाची विक्री सुरु आहे. मात्र गुजराती डाळिंब आकाराने लहान असल्याने दिल्लीच्या बाजारपेठएत महाराष्ट्रातील डाळिंबाला जास्त मागणी आहे.
दिल्ली बाजारपेठेत गुजराती डाळिंब सरासरी 25 रुपये किलो रुपयाने विकले जात आहे. मात्र अवकाळीचा दणक्यानंतरही महाराष्ट्रातील डाळिंबाला दिल्ली बाजारात मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील डाळिंबांना 70 रुपयांपासून 160 रुपये दराप्रमाणे चढाभाव मिळत आहे. महाराष्ट्रातील डाळिंबाची मोठी मागणी असल्याने दिल्लीतील व्यापारी सध्या पंढरपूर बाजार समितीमध्ये ठाण मांडून बसले असले आहेत. मात्र अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने पंढरपूर बाजारात डाळिंबाची आवक घटली आहे. चढ्या दरानेही येथील माल मिळत नसल्याने गुजराती डाळिंब घ्यावे लागत असल्याचे दिल्लीहून आलेल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
गुजरातमधील डाळिंब आकाराने लहान, चमकदार, स्वस्त आणि वाहतुकीला जवळ असल्याने दिल्ली बाजारात सध्या त्या डाळिंबाची विक्री होत आहे. महाराष्टातून येणारे डाळिंब आकाराने मोठे असून चवीलाही खूप गोड असल्याने या डाळिंबासाठी दिल्लीतील व्यापारी धडपडू लागले आहेत. गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे बागेतील डाळिंबावर आता डाग पडू लागले आहेत. यामुळे डाळिंब बाहेर काढणेही अवघड बनत चालले आहे. अशातही शेतकरी जमेलतसा मालबाहेर काढून बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे. आज लिलावात बहुतांश माल हा 100 रुपये पेक्षा जास्त दराने विकला गेला. डाळिंबाला मिळालेल्या चढ्या दरामुळे अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या डाळिंब उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. नुकसानामुळे आवक घटली असली तर डाळिंबाचा दर कमी न झाल्यानं शेतकरी समाधानी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- अवकाळीचा दणका! कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; भाज्यांचे भाव स्थिर
- ST strike : व्वा रे सरकार! कोविड विम्यासाठी नाही, पण मेस्मासाठी अत्यावश्यक सेवेत; भाजपची टीका
- कोट्यवधी खर्चून केलेल्या रस्त्याच्या उद्घाटनाला नारळ फोडताना पडला खड्डा, नारळ काही फुटला नाही!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha