नगरपालिकांच्या आचारसंहितेवर नेत्यांची नाराजी, निधी खर्चावर निर्बंध
एबीपी माझा वेब टीम | 18 Oct 2016 03:28 PM (IST)
मुंबई : आगामी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेवर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आचारसंहितेमुळे मार्चपर्यंत निधी खर्च करण्यावर निर्बंध येणार आहेत. सध्या काही जिल्हे वगळता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये निवडणुका नसलेल्या जिल्ह्यांचाही समावेश आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमुळे मार्चपर्यंत निधी खर्च करण्यावर निर्बंध येणार आहेत, शिवाय काही कामंही करता येणार नाहीत. त्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.