मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे नाराज असून ते पक्षाला लवकरच रामराम करणार असल्याची चर्चा रंगली आहे. नारायण राणे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना सध्या ऊत आला आहे.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीच्या सरचिटणीसपदावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी राजीनामा देणे, नितेश राणे यांचं नाव निलंबित आमदारांच्या यादीतून अचानक वगळलं जाणे यामुळे राणेंची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवाय काँग्रेसमध्ये अनेक वर्ष राहुनही मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने राणे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.

नारायण राणे यांनी शिवसेनेपासून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास

1968 - वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश

1968 - शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी

1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले

1990-95 - नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर

1991 - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले

1990-95 - याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद

1996-99 - युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान

1999 - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड

2005 - शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली

2005 - शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

2005 - शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी

2005 - आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड

2007 - काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड

2008 - पक्षविरोधी टिप्पणीमुळे काँग्रेसमधून निलंबन

2009 - विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण

2014 - लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा

2014 - मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा

2014 - विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून राणेंचा पराभव

2015 - वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही राणेंचा पराभव झाला. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी राणेंना पराभूत केलं