Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात राजकारणात उलथापालथ पाहायला मिळत आहेत. काही आमदारांसह शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह सध्या गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची विसर पडली, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. हे आमदार कोण आहेत, वाचा सविस्तर...


मंजुळा गावित 
एकेकाळी भाजपच्या कार्यकर्ते असणाऱ्या मंजुळा गावित या 2011 साली भाजपच्या अवघ्या तीन नगरसेवकांवर धुळे महानगर पालिकेच्या महापौर झाल्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी करत साक्री विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय म्हणून मंजुळा गावित यांची ओळख असून शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी साक्री विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी निधी आणतं धुळे शहराच्या विकासासाठी देखील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 20 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मिळवला. साक्री विधानसभा मतदार संघातून विजयी झाल्यानंतर आमदार मंजुळा गावित यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.


लता सोनवणे
लता सोनवणे या चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार आहेत. मागासवर्गीय महिला राखीव कोट्यातून त्या पहिल्या वेळेस आमदार झाल्या. त्या माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी निवडणुकीवेळी सादर केलेले जात प्रमाणपत्र वैध्य नसल्याचं सांगण्यात येत असून हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे.


चिमण आबा पाटील
जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील शिवसेनेचे आमदार आहेत. हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. स्थानिक नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत त्यांची फारसे न पटल्या मुळेच ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याचे सांगण्यात येतं. 1977 पासून त्यांनी सहा वेळा विधानसभा निवडणूक लढविली असून तीन वेळा ते आमदार झाले आहेत. गेल्या 45 वर्षांपासून ते राजकारणात आहेत. राहुरी कृषी विद्यापीठात 5 वर्ष सिनेट सदस्य राहिले आहेत. जिल्हा बँकेवर पाच वर्ष अध्यक्ष राहिले आहेत. 


किशोर अप्पा पाटील
शिवसेनेचे पाचोरा येथील आमदार असून ते सलग दुसऱ्या वेळेस निवडून आले आहेत. माजी आमदार स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांचे ते पुतणे आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय आहेत. पोलीस निरीक्षकांची नोकरी सोडून ते राजकारणात आले. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात पाचोरा विकास काम करण्यासाठी लागणारा निधी मिळवला. ते पाचोरा तालुक्याचे आमदार आहेत तर त्यांच्या पत्नी पाचोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत. किशोर पाटील यांनी पाच वर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष पदही भूषविलं आहे. याचसोबत गेली 15 वर्ष ते जिल्हा बँकेचे  संचालक आहेत


महत्त्वाच्या इतर बातम्या