अहमदनगर : मराठा मोर्चांच्या आयोजनातल्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या संजीव भोर यांना अहमदनगर पोलिसांनी नोटीस धाडली आहे.
संजीव भोर हे शिवप्रहार या मराठा संघटनेचे अध्यक्ष आहेत.
संजीव भोर यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याच्या शक्यतेने ही कारवाई करण्यात आली आहे. तुम्हाला 6 जिल्ह्यातून हद्दपार का करु नये, अशी नोटीस अहमदनगर पोलिसांनी दिली आहे.
संजीव भोर यांच्यावर सामाजिक आंदोलनाचे सुमारे 8 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येण्याची शक्यता आहे, अशी चिंता या नोटीसमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान भोर यांनी पोलीस उपाधीक्षकांसमोर आपली भूमिका मांडली आहे. तर 17 तारखेला अहमदनगरच्या प्रांतांसमोर त्यांना साक्ष नोंदवावी लागणार आहे.