आयसिस संशयित शाहिद खानला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 24 Jul 2016 12:56 PM (IST)
मुंबई : मराठवाड्यात आयसिसची पाळंमुळे खोलवर रुजताना दिसत आहेत. कारण नासेरबिन चाऊसच्या अटकेनंतर परभणीतून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं आणखी एका तरुणाला अटक केली आहे. शाहीद खान असं तरुणाचं नाव आहे. त्याच्याकडून एक किलो स्फोटकं आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलेत. एटीएसनं आज शाहिदला कोर्टात हजर केलं. त्याला 29 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. नासेरबीन आणि शाहिद मित्र आहेत त्यांनी मिळून योजना बॉम्ब बनविण्याची योजना आखली होती. डिटोनेटर आणि आरडीएक्स हे एकत्र करून ठेवले होते. शाहिदच्या आजीच्या घरात एका पिशवीत ही स्फोटकं सापडली आहेत. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईस दुजोराही दिला आहे. आठ दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी परभणी शहरात पाळत ठेवून होते. काही जणांवर या पथकाला संशय होता. याच संशयातून काल रात्री शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरातून शाहीद खानला या पथकानं ताब्यात घेतले आहे.