सांगली : सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी रात्री एका बियर शॉपवर छापा टाकला. यात सुमारे 5 लाख रुपयांचा बियरचा अवैध साठा जप्त करण्यात आला. मात्र कारवाईची जवाबदारी उत्पादन शुल्क विभागाची असताना पोलिसांना ही कारवाई करावी लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शहर पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सोमवारी रात्री पोलीस लाईन जवळच्या रत्ना बियर शॉपवर हा छापा टाकला. सांगली महापालिका निवडणूक आणि हॉटेल रत्ना मध्ये घडलेल्या पोलीस कर्मचारी खुनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली गेली.
छाप्यात दुकाना व्यतिरिक्त अन्यत्र विनापरवाना बियरचा साठा केल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी लगेचच राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाचारण केले. उत्पादन शुल्क विभागाकडून दुकानाचा तसेच अवैध बियरच्या साठ्याचा पंचनामा करण्यात आला. यावेळी सुमारे 265 बियरचे बॉक्स आढळून आले. उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत ही सर्व दारू जप्त केली आहे . तब्बल पाच लाख रुपये किमतींचा बियरचा साठा यावेळी जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी संजयनगर पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई अपेक्षित असताना संजयनगर पोलिसांना दारू साठ्यावर कारवाई करावी लागत आहे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
सांगलीत बियर शॉपवर पोलिसांची धाड, 5 लाखांचा बियरचा साठा जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2018 09:01 AM (IST)
उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई अपेक्षित असताना संजयनगर पोलिसांना दारू साठ्यावर कारवाई करावी लागत आहे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -