सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दुधनी गावातील शांभवी हॉटेलवर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली आहे. यामध्ये जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक करण्यात आली असून नव्या आणि जुन्या नोटांचा समावेश असेलली 2 लाख 64 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या कुटुंबियांचं हे हॉटेल आहे. अक्कलकोट पोलिसांनी ही कारवाई करत जुगार खेळणाऱ्यांना अटक केली.

पोलिसांना हॉटेलमधील या प्रकाराविषयी माहिती मिळाली होती. त्यानतंर पोलिसांनी धाड टाकत मोठी रक्कम जप्त केली. शिवाय 15 जणांना अटक करण्यात यशही मिळालं.