वर्धा : आयपीएलमधील गुजरात विरुद्ध पुणे संघातील सामन्यादरम्यान वर्ध्यात कॅशलेस जुगार खेळला जात असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी वर्धा आणि कारंजा येथून 6 जणांना अटक करण्यात आली आहे.


स्थानिक गुन्हे शाखेला रोठा शिवारात एका शेतात निर्जन स्थळी रात्री सट्टा चालवला जात होता. याचा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी धडक कारवाई केली. या कारवाईत मोबाईल, डीटीएच टीव्ही जप्त करण्यात आले आहे.

यावेळी समोरून फोन सुरू असताना 80 ला 82 चा भाव ऐकायला मिळत होता. क्रिकेट सट्ट्याचे सर्व व्यवहार कॅशलेस पद्धतीने फोनवर लावले जात होते. यात दोघांना अटक करुन, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, कारंजा येथे देविदास वंजारी यांचा घरात सट्टा लावला जात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी छापा टाकत चौघांना अटक केली.