मुंबई : कर्जमाफीच्या मागणीवरुन सुरु झालेल्या शेतकरी संपाची वाढलेली धग पाहता आता सरकारच्या मनात धडकी भरली आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यातील महत्वाच्या मंत्र्यांच्या घराबाहेर पोलिसांनी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
मूळचे सोलापूरचे असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख, चंद्रपूरचे असलेले अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, लातूरचे असलेले कामगारमंत्री संभाजी निलंगेकर आणि पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा समावेश आहे.
सुरक्षा वाढवलेले मंत्री/नेते
सुभाष देशमुख - सोलापूर
दिलीप गांधी - अहमदनगर
विजयकुमार गावित - नंदुरबार
सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर
गिरीश बापट - पुणे
संभाजी पाटील निलंगेकर - लातूर
दिलिप सोपल - बार्शी (स्वतःच टाळं लावून घेतलं)
भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले - शिर्डी
भाजप आमदार आर.टी.देशमुख - बीड
काँग्रेस खासदार राजीव सातव - हिंगोली
आमदार बबनराव लोणीकर - जालना
खासदार सुनिल गायकवाड - लातूर
सरकारनं पुणतांब्याच्या शेतकऱ्यांच्या संपानंतर 31 अल्पभूधारकांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. मात्र त्यासाठी 31 ऑक्टोबरची डेडलाईन ठेवली आहे. तर दूधाचे भाव वाढवण्यासाठी आणि हमीभावासाठी टाईम बाऊंड कार्यक्रम दिला आहे.
या सगळ्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत नाशिक आणि परिसरातील शेतकऱ्यांनी संप कायम ठेवला आहे.