Mns Aurangabad Rally 2022: 1 मे रोजी राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना पोलिसांनी काही अटी देखील घातल्या आहेत. या सभेला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 16 अटी लागू घाला आहेत. पोलिसांनी या सभेला परवानगी दिल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, पोलिसांनी घातलेल्या अटी व शर्तीचे निश्चितपणे पालन केले जाणार आहे. 


सभेला फक्त 15 हजार लोकच जमू शकतील        


यात एक महत्वाची अट पोलिसांनी घातली आहे. ज्यामध्ये या सभेला फक्त 15 हजार लोकच जमू शकतात, कारण ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे, त्या सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानाची क्षमता ही 15 हजार लोकांचीच असल्याचं पोलिसांचे म्हणणे आहेत. यावर बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले आहेत की, असं असलं तरी सुद्धा येणाऱ्या लोकांना कोणी थांबू शकत नाही. त्याच प्रमाणे जितकी लोक येथील त्यांना कसं सावरायचं आणि आवरायचं हे पोलिसांच्या मदतीने आम्ही करू, असं ते म्हणाले आहेत. तसेच उद्या मनसेच शिष्ट मंडळ हे या सभे संबंधित औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलता दिली आहे.   


या अटींचे करावे लागले पालन 



1. सभा संध्याकाळी 4.30 ते रात्री 21.45 वेळेतच आयोजित करावी, कार्यक्रमात कोणताही बदल करु नये


2. वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म यावरुन चिथावणी देणारं विधान करु नये


3. सभेत कुणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये


4. सभेसाठी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, निर्धारित ठिकाणीच पार्किंग करावं


5. कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शनही करु नये


6. अट 2, 3 आणि 4 बाबत सभेत सहभागी होणाऱ्यांना आयोजकांनी कळवावे


7. सभेतील स्वयंसेवकांची नावे, मोबाईल नंबर तसेच बाहेरुन येणाऱ्यांची अंदाजित संख्या एक दिवस अगोदर पोलिसांना कळवावी


8. सभेसाठी 15 हजारहून अधिक लोकांना निमंत्रिक करु नये, काही गोंधळ झाल्यास आयोजक जबाबदार राहतील


9. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशित केलेल्या जागी बॅरिकेट्स उभारावे


10. सभेसाठी आवाजाची मर्यादा 75 डेसिबल इतकी ठेवावी लागणार


11. सभेदरम्यान अत्यावश्यक सुविधांना बाधा येणार नाही, याची काळजी घ्यावी.


12. सभेच्या दिवसी वाहतुकीसंदर्भातील अधिसूचना सभेला येणारे वक्ते, कार्यकर्ते यांना बंधनकारक असेल.


13. सभेसाठीच्या वस्तू, जनरेटरची व्यवस्था आधीच करावी.


14. सभेदरम्यान अन्नदान किंवा मिठाई वाटप होणार असेल, तर त्यातून विषबाधा होणार नाही, याची काळजी घ्यावी.


15. कार्यक्रमाचं ठिकाण किंवा वेळ यामध्ये कोणताही बदल करू नये.