हातभट्ट्या पूर्णपणे नष्ट केल्या आहेत. त्यातील हजारो लीटर दारुही पोलिसांनी नष्ट केली आहे. भाईंदर व उत्तन सागरीय पोलिस ठाणे परिसरात मोठं जंगल आहे. या जंगलात काहीलोक हातभट्टीच्या माध्यामातून गावठी दारु तयार करत होते. भाईंदर पोलिसांनी त्यांच्या विरोधात महिनाभरापासून मोहीम राबवली आहे. 15 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी गावठी दारु अड्डे नष्ट करण्यासाठी ड्रोनचा वापर केला.
घनदाट जंगल असल्यामुळे पोलिसांनी ड्रोनचा वापर करुन जंगलात हातभट्ठी दारु बनवण्याच्या जागा शोधून काढल्या आणि त्या जागेवर पोलिसांनी स्वतः जाऊन हातभट्ठ्या नष्ट केल्या.
यापूर्वीही भाईंदर पोलिसांनी या भागात बोट आणि जंगलात गूगलच्या वापर करुन हातभट्ठीवर कारवाई केला होती. भाईंदर पोलिसांनी हातभट्ठी दारुच्या विरोधात प्रखरपणे मिशन सुरु केले आहे. परंतु जंगलात जागा हुडकण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. यासाठी पोलिसांनी आता ड्रोनचा वापर सुरू केला आहे.
या कारवाईमुळे हातभट्टी मालकांवर आता पोलिसांचा वचक बसला आहे. आतापर्यंत पोलिसांनी एका महिन्यात या भागात 16 जागा वर कारवाई करुन हजारो लिटरबनावटी दारु नष्ट केली आहे आणि 14 मालकांवर गुन्हा दाखल करून कारवाईही केली आहे.