हेडलाईन्स

शिर्डीत साई संस्थानवर IAS अधिकारी नेमा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

----------

युतीचा धर्म म्हणून भाजपच्या प्रचारात, कितीही डिवचलं तरी प्रचाराच्या मैदानात राहणार, सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण

----------

हायकोर्टाने 'ड्राय डे'वरील बंदी सशर्त उठवली,19 फेब्रुवारीला ड्राय डे नाही, 20 आणि 21 तारखेला ड्राय डे कायम, 23 तारखेला 5 वाजेपर्यंत ड्राय डे

----------

नागपूर : लकडगंज परिसरात प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं, तरुणीच्या राहत्या घरी दोघांचा गळफास, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

----------

1. मुंबईत खासदार किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडेबाजी, सोमय्यांनी मुलुंडमधील मुलाच्या वॉर्डात पैसे वाटल्याचा आरोप
----------
2. मुंबई महापालिका आखाड्यात 370 उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचे, एडीआर सर्व्हेनुसार शिवसेना-मनसेत सर्वाधिक गुंडांचा भरणा
----------
3. अंधेरीत भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या गाडीची काच फोडली, मुंबईत प्रचार न करण्याची अज्ञाताची धमकी
----------
4. टक्केवारीने मुंबईचा घात केला, पार्ल्यातील सभेत नितीन गडकरींचा आरोप, नागपूर महापालिका भ्रष्टाचार मुक्त असल्याचाही दावा
----------
5. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंची मुंबईत बुलेटवरुन सवारी, ट्रॅफिक टाळण्यासाठी मालाडपासून ठाण्यापर्यंत बुलेट प्रवास
----------
6. पाकिस्तानात दर्ग्याजवळ बॉम्बस्फोट 100 हून अधिक जणांचा मृत्यू, आयसिसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
----------
7. राणा दग्गुबट्टीचा बहुचर्चित सिनेमा 'गाझी अटॅक' आज प्रेक्षकांच्या भेटीला, तर नासिरुद्दीन शाह यांचा 'इरादा'ही प्रदर्शित होणार
----------
एबीपी माझा वेब टीम