LIVE : अखेर पनवेल महानगरपालिकेची स्थापना
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2016 02:01 AM (IST)
हेडलाईन्स 1. पेट्रोल 3 रुपये 38 पैशांनी तर डिझेल अडीच रुपयांनी महागलं, मध्यरात्रीपासून अंमलबजावणी, सामान्यांच्या खिशाला चाट -------------------- 2. पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा संताप अनावर, मुख्यमंत्र्यांना महिलांचा घेराव, सुरक्षेच्या प्रश्नावरुन मोठी गोची -------------------- 3. बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना पॅरोल नाही, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, सज्जाद मुघल फरार झाल्यानंतर सरकारला जाग -------------------- 4. पुण्यातील रिक्षा चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, तीन ओला कॅबची तोडफोड, तर रिक्षाचालकांच्या संपामुळं मुंबईकरांचे अतोनात हाल -------------------- 5. सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या 'आप'च्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी, 'एबीपी न्यूज'च्या बातमीनंतर संदीप कुमार यांच्यावर कारवाई -------------------- 6. हरियाणातील जमीन खरेदीप्रकरणी सोनिया गांधींचे जावाई रॉबर्ट वढेरा अडचणीत, धिंग्रा आयोगाचा रिपोर्ट सादर, माजी मुख्यमंत्री हुड्डांवरही ठपका -------------------- 7. सिंगूरमध्ये नॅनो प्रकल्पासाठी केलेलं भूसंपादन बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टांचा रतन टाटांना दणका, 12 आठवड्यात जमीन परत देण्याचे आदेश -------------------- 8. बिन भिंतीच्या शाळेत शिकून मुंबईकर मालविका जोशीचं आभाळाएवढं यश, ऑलिम्पियाडमध्ये पदकाची कमाई मालविकाचा अमेरिकेतील एमआयटीमध्ये प्रवेश -------------------- एबीपी माझा वेब टीम