नागपूर : नागपूरमध्ये मद्यपीला तपासणीसाठी घेऊन जात असताना त्याने हल्ला केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.


नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे यांनी दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी सुर्यकांत व्यास याला थांबवलं होतं. तपासणीसाठी नेताना त्याने विरोध केला. तसंच बारंगे यांना बाईकवरुन खाली पाडत हेल्मेट आणि दगडांनी जखमी केलं. या हल्ल्यात कॉन्स्टेबल बारंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

जखमी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यात आणखी एका हल्ल्याची भर पडली आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत कॉन्स्टेबलला मारहाण

पिंपरीमध्ये अंगावर गाडी घातल्याने पोलिसाचा मृत्यू


पोलिसांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ निवृत्त पोलिस रस्त्यावर


पुन्हा वर्दीवर हात, नंदुरबारमध्ये पोलीस उपनिरीक्षकास मारहाण


आता नाशिकमध्येही वर्दीवर हात, पोलिसाच्या अंगावर रिक्षा घातली!


गृहखात्याला नवा मंत्री गरजेचा : उद्धव ठाकरे


कल्याणमध्ये पोलिस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न


लालबागच्या कार्यकर्त्याकडून पोलिस निरीक्षकाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल


नगरमध्ये वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला, ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न