सांगली : ‘येत्या काही महिन्यात देशात धार्मिक मुद्यावरुन दंगली होतील.’ या वक्तव्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, राज ठाकरेंचं हे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. असं म्हणत सांगलीत भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली आहे.


राज ठाकरे यांच्या कालच्या (रविवार) भाषणानंतर सांगलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

भाषणादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा अशी तक्रारही भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी सोमवारी दुपारी भाजप कार्यकर्त्यांसह सांगली शहरातील संजयनगर पोलिस ठाण्यात जाऊन राज ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केली आहे.

त्यात त्यांनी म्हटलंय की, "राज ठाकरे यांचे कालचे भाषण घरात टीव्हीवर पाहिले. या भाषणात राज ठाकरेंनी समाजमन भडकावणारे मुद्दे मांडले. राम मंदीरच्या मुद्यांवर आणि निवडणुकांच्या तोंडावर दंगली होतील, असा ठाम दावाच त्यांनी केला आहे."

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

'पुढच्या काही महिन्यांत राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगली घडतील. तशी माहिती मला मिळाली आहे, राम मंदिर निश्चित झालं पाहिजे. पण निवडणुकांनंतर राम मंदिर व्हावं, भाजपने राजकारणासाठी त्याचा वापर करु नये,' असं राज ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, शिवाजी पार्कवरील भाषणात राज ठाकरेंनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींवर तुफान टीका केली होती.

VIDEO : 

संबंधित बातम्या :

राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावं : आशिष शेलार

2019 ला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज, मोदीमुक्त भारत करा : राज ठाकरे

वसई-विरारमध्ये चाळमाफियांचा हैदोस, राज ठाकरेंकडूनही दखल

केवळ अक्षयच नव्हे, दीपिका, आलियासह 'हे' सेलिब्रिटीही परदेशी!

आधी पवार-राज भेट, आता जितेंद्र आव्हाड म्हणतात...