बीड : नीट परीक्षेवरुन विरोधकांच्या टीकेचं लक्ष झालेले शिक्षणमंत्री विनोद तावडेंविरोधात आता अंबाजोगाईत पोलिस तक्रार झाली आहे. एका विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांमध्ये तावडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 
वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि प्रविण शिनगारे यांनी जाणीवपूर्वक माझ्या मुलाची फसवणूक केली, असं तक्रारीत म्हटलं आहे. संपूर्ण देशात नीट लागू करावी असा आदेश असताना माझ्या मुलाला एमएचसीईटीचा फॉर्म भरण्यास भाग पाडल्याचा दावा यात करण्यात
आला आहे.

 
कोर्टाने नीट परीक्षा अनिवार्य केल्यानं माझ्या मुलाची फसवणूक झाली, असं संबंधित पालकांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.