नाशिकमध्ये पोलिसांच्या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 10:39 PM (IST)
नाशिक : दोन पोलिसांच्या मारहाणीत 26 वर्षीय ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव गावात ही घटना घडली. बाळू नामदेव खोडके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले बाळू नामदेव खोडके हे ग्रामपंचायत सदस्य होते. या घटनेनंतर संतप्त जमावाने दोन्ही पोलिसांना बेदम मारहाण केली. दरम्यान, बाळू खोडके यांचा मृतदेह घोटी पोलिस ठाण्यात आणून नातेवाईकांचे आंदोलन सुरु केलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळ्याला नेण्यात येणार आहे.