आरोपी छगन मदने हा मुंबईत असतो. ज्या जमिनीत सयाजी शिंदे यांनी झाडं लावली होती, ती जागा आप्पा मदने यांच्या मालकीची होती. त्यांच्या परवानगीविना ही झाडं लावण्यात आली होती. तसंच आप्पा मदनेंच्या जागेतच त्यांच्या परवानगीविना ग्रामस्थांनी शाळा बांधली होती. ग्रामस्थांनी मदनेंच्या जागेतील झाडं तोडून नेली होती, पाण्याची पाईपलाईनही तोडली होती. अशा अनेक कारणांमुळे मदने कुटुंब नाराज होतं.
याच रागातून छगन मदनेनं मुंबईतून गावी जात सर्व झाडं तोडली आहेत. काल या वृक्षतोडीसंदर्भात आप्पा मदनेला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केलं होतं. मात्र आप्पा मदनेनं झाडं तोडली नसल्याचं समोर आल्यानं त्याची न्यायालयानं सुटका केली होती. आता छगन मदनेला अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
संबंधित बातम्या :
सयाजी शिंदेंच्या झाडांवर कुऱ्हाड चालवणारा विकृत सापडला!
अभिनेते सयाजी शिंदेंनी लावलेली झाडं अज्ञातांनी तोडली!
रिपोर्ट : सातारा : सयाजी शिंदेंकडून वृक्षसंवर्धन करत नव्या वर्षाचं स्वागत