दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो... 


1. राज्यात शुक्रवारी 40 हजाराहून अधिक रुग्ण, मुंबईतील रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं चित्र, पण उपचाराधीन रुग्ण आणि ऑक्सिजनची मागणी वाढली. 


2. मध्य रेल्वेवर आज दुपारी 2 वाजल्यापासून 36 तासांचा जम्बो मेगाब्लॉक, ठाणे ते दिवादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल बंद, पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक


 मध्य रेल्वेवर 36 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर 36 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक असेल. हा मेगा ब्लॉक 08 जानेवारी (शनिवार) रोजी दुपारी 02.00 ते 10 जानेवारी (सोमवार) रोजी दुपारी 02.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल.


 


3. मुंबई, ठाण्यात हलक्या पावसाच्या सरी,  पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचे ढग, विदर्भात उद्या गारपिटीची शक्यता


4. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा त्रुटींसंदर्भात पंजाब सरकारकडून कारवाई सुरु, फिरोजपूरमध्ये दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल, मोदींच्या ताफ्याजवळील लोक भाजपचे असल्याचा काँग्रेसचा दावा


5. भाजपचे कार्यकर्ते पंतप्रधान मोदींच्या ताफ्याजवळ कसे पोहोचले? पंजाबमधील व्हिडिओमुळे नवा वाद  रंगण्याची चिन्हं 


पाहा व्हिडिओ : स्मार्ट बुलेटिन : 08 जानेवारी 2022 : शनिवार



6. ISIS मध्ये भरती होण्यासाठी तरुणांना फितवणाऱ्या मुंबईतील दोघांना आठ वर्षाची सक्तमजुरी; विशेष NIA कोर्टाचा निर्णय


7. एक हजार द्या, लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा! लसीकरण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक


8. महाराष्ट्र सरकार राज्यातील सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या विचारात, सोन्याचे दर कमी होणार


सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपली कर प्रणाली सुधारण्याच्या उद्देशाने आणि महसूल वाढीसाठी महाराष्ट्र सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा विचार करत आहे.


9. मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकवले मुंबई पोलिसांचे कोट्यवधी रुपये, माहिती अधिकारातून माहिती उघड


10. IPL 2022 वर कोरोनाचं संकट, मेगा ऑक्शन पुढे ढकलण्याची शक्यता