Minister Yogesh Kadam : नवीन वर्षाच्या स्वागतवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. 8 अप्पर पोलिस आयुक्त, 29 पोलिस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलिस आयुक्त, 2184 पोलिस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलिस अंमलदार गस्तीवर असणार आहेत, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Minister Yogesh Kadam) यांनी दिली.  शहरातील महत्वांच्या चौकात नाकाबंदी ठेवली जाणार असल्याचे कदम म्हणाले. 


मुंबई पोलीस सक्षम आहेत. जगातील सुरक्षित शहर म्हणून मु़ंबईची ओळख आहे. ती प्रतिमा पोलिस कायम ठेवतील हा विश्वास असल्याचे योगेश कदम म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पोलिस प्रशासनला सुरक्षेबाबत सूचना दिलेल्या आहेत. नव वर्षाच्या सुरक्षेसाठी 12 हजार अंमलादार असतील तर महिला पोलिसही आहेत असे कदम म्हणाले. नव वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी कोणतेही दडपण बाळगू नये. पोलीस आपल्या सुरक्षेसाठी तयार असल्याचे कदम म्हणाले. ड्रग्जबाबतचा  विळखा एका दिवसात संपणार नाही असे कदम म्हणाले. ड्रग्जचं सेवन खासगी पार्टीत मोठ्या प्रमाणात होतं आहे, त्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचे कदम म्हणाले. 


ड्रग्ज पार्टींवर कडक कारवाई होणार


ड्रग्ज पार्टींवर कडक कारवाई होणार आहे. 1 ग्रॅम असो की त्याहून अधिक कारवाई होणारचं असे कदम म्हणाले. विकणारा आणि विकत घेणारा या दोघांवरही कारवाई होणार असल्याचे कदम म्हणाले. मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम सुरू राहणार आहे. 800 गाडया जप्त केल्या आहेत, काही महिन्यात सर्वच जबाबदारी पोलिसांवर टाकून चालणार नाही. नागरिकांनही जबाबदारीने वागलं पाहिजे, असे रेव्ह पार्टी किंवा इतर गुप्त पार्टींवर एटीसी व अंमली पदार्थ विभागाचे पोलिस लक्ष ठेवून राहतील


वाहतूक विभागाकडून ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह ची विशेष मोहिम राबवली जाणार 


माझाकडे गृह विभागाचं महत्वाचं खातं आहे नवीन वर्षात ड्रग्ज तस्करांवर कडक कारवाई करुन तरुणाईला या विळख्यातून बाजूला करण्याचा माझा निश्चय राहील असेही कदम म्हणाले. 
वाहतूक विभागाकडून ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह ची विशेष मोहिम राबवली जाणार आहे. 
सावर्जनिक ठिकाणी गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तवणूक, अनधिकृत मद्य विक्री, अंमली पदार्थ विक्री/सेवन यांवर कडक करवाई केली जाणार असल्याचे कदम म्हणाले.