अहमदनगर : भाजप नेते बबनराव पाचपुतेंना जोरदार दणका बसला आहे. पाचपुतेंचा हिरडगावचा साईकृपा कारखाना अखेर जप्त करण्यात आला आहे. पावणे चारशे कोटींच्या कर्जवसुलीसाठी अखेर पंजाब नॅशनल बँकेने कारखान्याचा तत्वत: ताबा घेतला.
साईकृपा कारखान्याचा ताबा घेण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. पावणे चारशे कोटींच्या कर्जवसुलीसाठी जप्तीचं पाऊल उचलण्यात आले आहे.
कर्जासाठी तारण ठेवलेला देवदैठणचा कारखाना आणि श्रीगोंदा शहरातील माऊली निवासस्थानही जप्त केला जाणार आहे.
पाच दिवसांपूर्वीच जाहीर करुन ताबा घेतल्याची माहिती समोर येते आहे. शेतकर्यांच्या थकीत 35 कोटींसाठी सरकारने पूर्वीच जप्तीची कारवाई केली होती. मात्र, त्यास कारखान्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तर थकबाकी न भरल्यानं 23 मार्चला बॅकेने प्रतिकात्मक ताबा घेतला होता.