मुंबई : पीएमसी बँक खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा दोन खातेधारकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पैसे अडकल्यानं दुकान कसं चालवायचं ? या चिंतेत असतानाच फट्टोमल पंजाबी यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर बँकेतील पैशांच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या निवेदिता बिजलानी या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. दोन दिवसात तीन खातेदारांच्या मृत्यूमुळे पीएमसी खातेधारकांमधला रोष वाढला आहे. बँकेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.
पंजाबी हे मुलुंडमधले रहिवाशी आहेत. फट्टोमल पंजाबी यांचे पीएमसी बँकेत खाते होते. फट्टोमल यांच्या खात्यात 8 ते 9 लाख रुपये होते. दुपारी फट्टोमल यांना दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. बँकेविरोधात केलेल्या आंदोलनात फट्टोमलदेखील सहभागी होते. ज्या कॉलनीमध्ये राहतात त्या कॉलनीतील 95 टक्के लोकांची बँक खाती ही पीएमसी बँकेत आहेत.
बँकेतील पैशाच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या निवेदिता बिजलानी या डाॅक्टर महिलेने आत्महत्या केली. बिजलानी या पेशाने डॉक्टर होत्या. 39 वर्षीय बिजलानी या आपल्या वडीलांसोबत वरसोवा मॉडेल टाउन या परिसरात राहत होत्या. सोमवारी रात्री बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्या खाल्या होत्या. बिजलानी यांचे खाते पीएमसी बँकेत होते. बँकेतील पैशाच्या तणावातून बिजलानी यांनी आत्महत्या केली असेल असे वाटत नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, बिजलानी गेली काही वर्षे तणावात होत्या. गेल्या वर्षी मार्चमध्ये अमेरिकेतदेखील बिजलानी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
पीएमसी बँक घोटाळ्यात तीन बळी ; खातेधारकांचा रोष वाढला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2019 11:51 AM (IST)
पैसे अडकल्यानं दुकान कसं चालवायचं ? या चिंतेत असतानाच फट्टोमल पंजाबी यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर बँकेतील पैशांच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या निवेदिता बिजलानी या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. २४ तासांत तीन खातेदारांच्या मृत्यूमुळे पीएमसी खातेधारकांमधला रोष वाढला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -