1. अयोध्या प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता, दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांचा वेळ, सरन्यायाधीशांच्या भूमिकेकडे लक्ष


2. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार, भाजपच्या संकल्पपत्रात घोषणा, विरोधकांकडून टीका

3. नारायण राणेंच्या कणकवलीत उद्धव ठाकरेंचा दौरा, तर पंतप्रधान मोदींच्या अकोल्यासह राज्यात तीन प्रचार सभा, शरद पवार बीडमध्ये

4. काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले नेते भाजपची संस्कृती बदलतील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल, एबीपी माझाच्या मुलाखतीत नितीन गडकरींचं वक्तव्य

5. मराठा आरक्षण रद्द झाल्याचा लेखक नामदेव जाधव यांचा व्हिडीओतून दावा, तर जाधवांचा दावा खोटा असल्याचा विनोद पाटील यांचं स्पष्टीकरण

6. दाऊदचा हस्तक इकबाल मिर्चीसोबत कथित व्यवहाराप्रकरणी प्रफुल्ल पटेलांना ईडीची नोटीस, 18 तारखेला चौकशी, गैरव्यवहार झाला नसल्याचा पटेलांचा दावा

7. दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून, सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवर

8. विरारमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या गॅलरीचा भाग कोसळून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, तर 80 पेक्षा जास्त कुटुंब सुखरुप बाहेर

9. पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा टोमॅटोला फटका, किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचा दर 80 रुपयांवर, इतर भाज्याही महागल्या

10. डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूची दमदार सुरुवात, पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया मरिस्का तुनजुंगचं आव्हान मोडीत