पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येऊन सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती वॅक्सीन तयार केलं जातं आहे. या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे.  त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी काल एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या दौऱ्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता आहे.


कोरोनाचं संक्रमण वाढत असताना सिरम इन्स्टिट्यूटकडून एक आनंदाची बातमी आहे. सरकारला 250 तर खासगी औषध विक्रेत्यांना हजार रुपयात कोविशिल्ड लसीचा डोस देण्यात येणार असल्याचं सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे.


पंतप्रधान मोदींचा सर्वाधिक  कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक  कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.


लस वितरणासंदर्भात राज्यात टास्क फोर्स स्थापन


कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक  कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.


कोरोनाची आकडेवारी दिवाळीनंतर वाढली


राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवाळीनंतर वाढताना दिसत आहे. काल राज्यात 4153 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर नवीन 3729 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1654793 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 81902 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.74% झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.