Central Government: केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने निधीची भरभरून तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सहा विविध प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने 1 हजार 304 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये 50 टक्के अर्थात 652 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून राज्याला मिळणार आहे. त्यानुसार राज्याच्या नगर विकास विभागाने एमएमआरडीए (Mmrda), पीएमआरडीए (Pmrda) आणि सिडको (Cidco) प्रशासनांना 652 कोटी रुपयांचा निधी वळता केला आहे. परिणामी केंद्राची नजर असलेल्या राज्यातील सहा प्रकल्पांना आता गती मिळणार आहे.
या प्रकल्पांत मुंबईतील (MUmbai) एमएमआरडीएच्या (MMRDA) शिवडी-वरळी उन्नत मार्ग (Shivdi-Worli Elevated Road), कुर्ला ते वाकोला उड्डाणपूल (Kurla to Vakola Flyover ) आणि बीकेसी ते एलबीएस उड्डाणपूल ( Bkc to Lbs Flyover) यांवरील उन्नत मार्गिका, तसेच बीकेसी ते वाकोला जंक्शन उन्नत मार्गिकेचा (BKC to Vakola Junction Elevated Line) समावेश आहे. याशिवाय पुणे विद्यापीठ चौकातील पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या मेट्रो रेल मार्गिकेसोबत (Metro Rail Route) एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी होणार आहे. दरम्यान, सिडको अंतर्गत येणाऱ्या कोंढाणे प्रकल्प पाणी पुरवठा योजना आणि बाणगंगा प्रकल्प पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. एकूणच मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai) आणि पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) काबीज करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Maharashtra Government) कामाला लागल्याचे दिसत आहे.
कुठल्या प्रकल्पासाठी किती तरतूद?
एमएमआरडीए (MMRDA)
- शिवडी वरळी उन्नत मार्गसाठी 250 कोटी रुपये.
- कुर्ला ते वाकोला उड्डाणपूल आणि बीकेसी ते एलबीएस उड्डाणपूल उन्नत मार्गासाठी 87 कोटी 50 लाख रुपये.
- बीकेसी ते वाकोला जंक्शनसाठी 22 कोटी 50 लाख रुपये.
पीएमआरडीए (PMRDA)
- पुणे विद्यापीठ (University of Pune) चौकात मेट्रो रेल मार्गिकेसोबत एकात्मिक दुमजली उड्डाणपुलासाठी 37 कोटी 50 लाख रुपये
सिडको (Cidco)
- कोंढाणे प्रकल्प पाणी पुरवठा योजनेसाठी 125 कोटी रुपये
- बाणगंगा प्रकल्प पाणी पुरवठा योजनेसाठी 129 कोटी 50 लाख रुपये
इतर महत्वाच्या बातम्या: