Sindhrdurg News : सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना काळात खासदारांचा आठ हजार कोटी निधी थांबवला आणि स्वतःसाठी साडेसात हजार कोटींचे आलिशान विमान घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला. सिंधुदुर्गमध्ये (Sindhrdurg) प्रचारप्रमुख म्हणून आलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या लोकांच्या पोटावर पाय आणल्याची टीकाही त्यांनी केली. 


विनायक राऊतांना पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात खासदारांचा 8000 कोटी निधी थांबवून स्वतःसाठी 7500 कोटींचे आलिशान विमान घेतलं असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. प्रचारप्रमुख गोव्यातून आणावे लागतात, अशी वेळ भाजपवर आली असल्याची टीका करत प्रमोद सावंत यांनी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांवर अन्याय केला. सिंधुदुर्गातील लोकांच्या पोटावर पाय आणण्याचं काम गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्याची टीका देखील विनायक राऊत यांनी केली.


प्रमोद सावंतांना टोला


सिंधुदुर्गसाठी प्रचारप्रमुख गोव्यातून आणावे लागतात अशी वेळ भाजपवर आली असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली. प्रमोद सावंत यांनी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांवर अन्याय केला, लोकांच्या पोटावर पाय आणण्याचं कामं केल्याचा आरोपही त्यांनी केला.


राणे पिता-पुत्रांवर टीकास्त्र


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षात जे जे शक्य आहे, ते पूर्ण करण्याचे प्रयत्न केला. एक आदर्श लोकप्रतिनिधी बनण्यासाठी प्रयत्न केला. ज्यांना केंद्रात मोदींमुळे बसता आले, त्यांनीही आपला लेखाजोखा मांडावा, असा टोला विनायक राऊतांनी नारायण राणे यांचे नाव न घेता टोला लगावला. मात्र, आपण खासदार असताना जनतेसाठी जी कामे केली, त्या कामांचा लेखाजोखा मांडला.

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार 101 टक्के पडणार ही मोदी गॅरंटी असल्याची टीका देखील यावेळी विनायक राऊत यांनी केली. विनायक राऊत यांच्यावर टीका करण्यासाठी कालपासून पुन्हा टिवटीव सुरू झाली असा टोला आमदार नितेश राणे यांना लगावत. निलेश राणे या सख्ख्या भावाने गुहागरमध्ये काय केले? त्याबाबत बोलावं, असा सवाल उपस्थित केला आहे.

प्रमोद जठारांना विनायक राऊतांचं प्रत्युत्तर


माजी आमदार प्रमोद जठार यांनी विनायक राऊत खलनायक असल्याची टीका केली होती, यावर 'हो, विनायक राऊत खलनायकच आहे, जठार तुमच्या दलालीला आळा घालण्यासाठी मी खलनायक आहे. आमच्या आघाडीमध्ये कोणीही अब्जोपती नेता नाही. आमच्या केंद्रीय मंत्र्यांचा दिल्लीत बंगला असून त्याचा सर्वसामान्य जनतेला काही उपयोग नाही. मात्र, माझं घर असून ते सर्वसामान्य जनतेला खुलं आहे. तसेच गेल्या 10 वर्षापूर्वी विनायक राऊतची जेवढी जमीन होती, तेवढीच आहे. माझी जरा जरी जमीन वाढली, तरी राणे कुटुंबीयांना लाभो, असा टोला राणेंना लगावला.