PM Modi Navi Mumbai Visit LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत, दीघा रेल्वे स्थानक ते नवी मुंबई मेट्रो, पंतप्रधान मोदींच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण

PM Modi Navi Mumbai Visit LIVE : : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नाशिक येथे युवा महोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर. ते शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूचं उद्घाटन केले.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jan 2024 06:05 PM
PM Modi Speech : जिथे दुसऱ्यांच्या आशा संपतात, तिथून मोदींची गॅरंटी सुरु होते - पंतप्रधान मोदी 

PM Modi Speech :  आज मोदी गॅरंटी ही देशातल्या घराघरात पोहचली आहे. जिथे दुसऱ्यांच्या आशा संपतात, तिथे मोदींची गॅरंटी सुरु होते, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

PM Modi Speech : त्यामुळे आधीच्या सरकारला देशाचा विकास करता आला नाही, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा 

PM Modi Speech : अटल सेतू हा वांद्रे वरळी सी लिंकपेक्षा जास्तपटीने आधुनिक आहे. तेव्हाच्या सरकारला हा सेतू बनवण्यासाठी 10 वर्ष लागली होती. काहीच वर्षात हा अटल सेतू मुंबईकरांच्या सेवेत आलाय. ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देशावर राज्य केलं, त्यांची नियत चांगील नव्हती. त्यामुळे त्यांना देशात विकास करता आला नाही. 

PM Modi Speech : 10 वर्षांपूर्वी घोटाळ्यांची चर्चा होती, आता प्रकल्पांची चर्चा होतेय - पंतप्रधान मोदी 

PM Modi Speech : मागच्या 10 वर्षात भारत बदलला आहे याची चर्चा होत आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा होत होती,आता प्रकल्पांची चर्चा होतेय. 2014च्या निवडणुकीआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो त्यावेळी काही संकल्प मी केले होते.आज ते संकल्प पूर्ण होताना मी बघतोय. 

PM Modi Speech : अटल सेतूमुळे लोकं अनेक कारणांमुळे आनंदी आहेत - पंतप्रधान मोदी

PM Modi Speech :  मागील अनेक दिवसांपासून या अटल सेतूची चर्चा होतेय, आता या अटल सेतूची विशालता पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झालेत. ही सागरी सेतू बनवण्यासाठी जपानने जे सहकार्य केलंय, त्यासाठी त्यांचे आभार

PM Modi Speech : हा अटल सेतू मुंबईकरांना समर्पित, ही मोदींची गॅरंटी होती

PM Modi Speech :  जी गॅरंटी मोदी सरकारने दिली तीच गॅरंटी महाराष्ट्र सरकार पुढे नेत आहे. आमच्यासाठी लोकार्पण, शिलान्यास हा एका दिवसाचा कार्यक्रम नसतो. आम्ही लोकांसाठी काम करतो, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. 

PM Modi Speech : पंतप्रधान मोदी यांचे भाषण 

PM Modi Speech : अटल सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो तेव्हा मी छत्रपती शिवरायांना सांगितलं होतं, की देश बदलेलही आणि पुढेही जाईल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. 

PM Modi Speech :  पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात

PM Modi Speech :  पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून त्यांच्या भाषणाला सुरुवात केली आहे.

PM Modi : पंताप्रधान मोदी यांच्या हस्ते लेक लाडकी योजनेअतंर्गत धनादेश 

PM Modi : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दोन जुळ्या बहिणींना लेक लाडकी या योजनेअंतर्गत प्राथमिक स्वरुपातील धनादेश देण्यात आलाय. 

लेक लाडकी योजनेचा शुभारंभ, महाराष्ट्राच्या लेकींसाठी योजना 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लेक लाडकी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 

PM Modi Navi Mumbai Visit : महाराष्ट्रातील आठ प्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण 

PM Modi Navi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील आठ प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले आहे. 

PM Modi Navi Mumbai Visit : दीघा रेल्वे स्थानक ते नवी मुंबई मेट्रो, पंतप्रधान मोदींच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण 

PM Modi Navi Mumbai Visit  :  : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामध्ये ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंट, नवी मुंबई मेट्रो, दीघा रेल्वे स्थानक या लोकार्पण कार्यक्रमांचा समावेश करण्यात आलाय. 

CM Eknath Shinde Speech : हा प्रकल्प गेमचेंजर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण 

CM Eknath Shinde Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


आज 22 किलोमीटरचा सी ब्रीज सुरु झाला आणि त्याचा शुभारंभ मोदींनी केलाय. 


या सेतूचे भूमिपूजन मोदींनी केले होते आणि शुभारंभ देखील मोदींनी केलं आहे


कोविड काळ होता तरी देखील अधिकाऱ्यांनी काम पूर्ण केले


हा प्रकल्प गेमचेंजर आहे


अत्याधुनिक यंत्रणा वापरून हा प्रकल्प आपण पूर्ण केला


मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण याचा शुभारंभ होईल


लेक लाडकी लखपती याचा आपण शुभारंभ आपण करत आहोत


हा सेतू अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाप्रमाणेच मजबूत आहे


देशात मोदींची गॅरंटी आहे तशी या सेतूची देखील गॅरंटी आहे


मोदीजी राज्यासाठी वेळ देत असतात


मोदीं एवढं प्रेम देशात कुणालाच मिळत नसेल


विरोधकांना हे  खटकत त्यांच्या पोटात दुखत


अबकी बार 400 पार हा नारा मजबूत करायचा आहे


अबकी बार मोदी सरकार आणि राज्यात अबकी बार 45 पार

Ajit Pawar Speech : आज रायगडमध्ये तिसरी मुंबई तयार होते, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

Ajit Pawar Speech :  अजित पवार


नारी शक्तीसाठी खूप मोठे काम झालं


उज्वला योजना हा त्याचा एक भाग आहे


अटल सेतू आजपासून सुरू झाला आहे


आज रायगडमध्ये तिसरी मुंबई होत आहे


आता 24 मिनिटात मुंबईत जाता येणार आहे


रायगडकरांच्या जीवनात अनेक बदल होणार आहेत


आज भारत यशाच्या शिखरावर पोहोचत आहे


भारत युवकांचा देश म्हणून ओळखला जात आहे


युवकांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी मोदी सरकारने स्टार्ट अप इंडिया सुरू केले आहे


आज भारत सर्वच क्षेत्रात पुढे जात आहे


मोदी असे राजकीय नेते आहेत जे युवकांचा नेहमी विचार करत असतात

Devendra Fadanvis Speech : देशात मोदी राज आलं म्हणून हा सेतू पूर्ण, फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Devendra Fadanvis Speech :  देवेंद्र फडणवीस 


आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे


अटल सेतूचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींनी केले आणि उदघाटन देखील त्यांनी केले


आपल्या देशात मोदी राज आलं म्हणून हा सेतू पूर्ण झाला


40 वर्षात जे झालं नाही ते मोदी सरकारने करून दाखवलं


काही लोक म्हणत होते फ्लेमिंगो सेन्सेटीव्ह आहेत त्याचे काय होणार


पण आज फ्लेमिंगोची संख्या देखील वाढली आणि सेतू देखील बनला


मोदी सरकारने एमएमआरडीएला कर्ज देण्याचा निर्णय घेतला


हा सेतू आम्ही कोस्टलरोडला जोडत आहोत


वर्सोवा ते विरार आम्ही तयार करत आहोंत


विरार ते अलिबाग आम्ही नवीन कॉरिडॉर करत आहोत


एक रिंग रोड आम्ही तयार करत आहोंत
हे स्वप्न येत्या तीन ते चार वर्षात आम्ही पूर्ण करू हा आम्हाला विश्वास आहे


सुर्या योजनेचा देखील आम्ही शुभारंभ आम्ही करत आहोत


मुंबईला आता ताकद रायगड देखील


नवीन इकॉनॉमिक्स हब तयार होणार आहे


या सेतूमुळे या विभागाला जोडला जाईल


विमान तळ देखील याच वर्षाच्या शेवट पर्यत होणार आहे


मोदी आमच्या मागे डोंगरासारखे उभे आहेत म्हणून हे प्रकल्प पूर्ण होत आहेत

CM Eknath Shinde on PM Modi : आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा, पंतप्रधान मोदी गौरवमूर्ती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

CM Eknath Shinde on PM Modi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचा गौरवमूर्ती असा उल्लेख करत, आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असल्याचं म्हटलं. 

PM Modi Navi Mumbai Visit : अटल सेतू पंतप्रधान मोदी यांच्यामुळे पूर्ण झाला - देवेंद्र फडणवीस

PM Modi Navi Mumbai Visit : अटल सेतूचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींनी केले आणि उदघाटन देखील त्यांनी केले. त्यांच्याचमुळे हा अटल सेतू पूर्ण झाला असल्याची भावना यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

PM Modi Navi Mumbai Visit LIVE : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात

 PM Modi Navi Mumbai Visit LIVE :  अजित पवार यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केलीये. 

PM Modi Navi Mumbai Visit : अजित पवारांचे हिंदीतून भाषण, पंतप्रधान मोदींचे केले कौतुक

PM Modi Navi Mumbai Visit :  पंतप्रधान मोदी हे नवी मुंबईत दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी पहिले भाषण केले. त्यांनी त्यांचे भाषण हिंदीतून केले. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक देखील केले. 

पंतप्रधान मोदी नवी मुंबईत दाखल, राम मंदिराची प्रतिकृती भेट

अटल सेतूचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे नवी मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांना राम मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली. 

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी सभास्थळी दाखल 

PM Modi Mumbai Visit :  पंतप्रधान मोदी हे नवी मुंबईतील कार्यक्रमस्थळी पोहचले आहेत. तसेच ते आता जनतेला संबोधित करतील. 

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार दीघा रेल्वेस्थानकाचं उद्घाटन 

PM Modi Mumbai Visit :  अटल सेतूचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करणार आहेत. 

Mumbai Trans Harbour Link Inauguration PM Modi LIVE : पंतप्रधान मोदींचा अटल सेतूवरुन प्रवास 

 Mumbai Trans Harbour Link Inauguration PM Modi LIVE : उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास देखील केला. 
 

असा आहे अटल बिहारी वाजपेयी सेतू, पाहा फोटो 

पंतप्रधान मोदी यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थातच अटल सेतूचे उद्घाटन केले.






Atal Setu Inauguration : मुंबईकरांच्या सेवेत अटल सेतू दाखल, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन 

Atal Setu Inauguration : अटल सेतूचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अटल सेतूविषयी माहिती घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत. 


Mumbai Trans Harbour Link Inauguration PM Modi LIVE : पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन 

Mumbai Trans Harbour Link Inauguration PM Modi LIVE :  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link)  प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू (Nhava Sheva Atal Setu) उद्घाटन  करण्यात आले आहे. 

PM Modi Atal Setu : पंतप्रधान मोदींचा ताफा अटल सेतूवर दाखल 

PM Modi Atal Setu : मुंबईत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे अटल सेतूचं उद्घाटन करण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांचा ताफा अटल सेतूवर दाखल झाला आहे. 

PM Modi in Mumbai Visit LIVE Updates : दीघा स्थानकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन 

PM Modi in Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदींच्या हस्ते दीघा रेल्वेस्थानकाचं देखील उद्घाटन करण्यात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या रेल्वेस्थानकाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लागून राहिली होती.

PM Modi in Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदी अटल सेतूचं करणार उद्घाटन

PM Modi in Mumbai Visit LIVE Updates :  पंतप्रधान मोदी हे मुंबईत दाखल झाले असून ते बई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link)  प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू (Nhava Sheva Atal Setu) उद्घाटन करणार आहेत. गेली काही वर्षे निर्माणाधीन असलेल्या या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आणि प्रतीक्षा होती. 

PM Modi in Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल

PM Modi in Mumbai Visit LIVE Updates :  पंतप्रधान मोदी हे मुंबईत दाखल झाले असून अटल सेतूचे उद्घाटन करणार आहेत. 

PM Modi Nashik Full Speech : पंतप्रधान मोदींचं भाषण UNCUT, पाहा व्हिडीओ

PM Modi Nashik Full Speech : पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवात देशातील जनता आणि युवांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले, पंतप्रधान मोदींचं A टू Z भाषण पाहा.


PM Modi Nashik Speech : जिजाऊंना अभिवादन करत मोदींचं मराठीतून भाषण

PM Modi Nashik Speech : जिजाऊंना अभिवादन करत मोदींचं मराठीतून भाषण पाहा व्हिडीओ


PM Modi Bhajan in Nashik Kalaram Mandir : पंतप्रधान मोदी भजनात दंग, Video व्हायरल

PM Modi in Nashik Maharashtra Visit LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात भजनाचा आनंद घेतला. यावेळी पंतप्रधान टाळ वाजवताना दिसले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


पाहा व्हिडीओ :






 

PM Modi Cleanliness Drive : 22 जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम राबवा, पंतप्रधानांंचं आवाहन

PM Modi in Maharashtra Nashik Mumbai Visit LIVE Updates : 22 जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम राबवा, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.





PM Modi Kalaram Mandir Darshan : पंतप्रधान मोदींनी टाळ वाजवून केलं भजन



 
National Youth Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

PM Modi in Nashik : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी युवकांना यशस्वी भविष्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.



 


PM Modi in Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदी मुंबईकडे रवाना

PM Modi in Maharashtra Visit LIVE Updates :  पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरद्वारे मुंबईकडे रवाना झाले आहे. मुंबई ट्रान्स हार्बर अटल सेतूचं उद्घाटन करतील.

PM Modi in Nashik LIVE Updates : तरुणांनी सक्रीय राजकारणात यावं, परिवारवाद संपेल

PM Modi in Nashik LIVE Updates : 'देशाची युवा पिढी तयार होत आहे, गुलामी आणि तणावापासून मुक्त आहे. आता युवा पिढी म्हणते विकास आणि विरासत. 
सरकारने अनेक योजना राबवून देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला. भारत ही लोकशाहीची माता आहे. जर तुम्ही सक्रीय राजकारणात आलात, तर परिवारवादाच्या राजकारणाला कमी कराल. परिवारवादाच्या राजकारणाने देशाचं नुकसान केलंय.' असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

PM Modi in Nashik Visit LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

PM Modi in Nashik Visit LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?


माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो. 


महाराष्ट्र ही वीरभूमी


हा केवळ योगायोग नाही, देशातील अनेक महान विभूतींचा संबंध महाराष्ट्राच्या धर्तीशी संबंध आहे. महाराष्ट्र ही वीरभूमी आहे. राजामाता जिजाऊसारखी मातृशक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नायकाला जन्म दिला. याच धर्तीने देवी अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकरसारख्या महान नारीशक्ती देशाला दिली. याच धर्तीने लोकमान्य टिळक, वीर सावरकर, दादासाहेब पोतनीस, चाफेकर बंधू, आनंद कन्हेरे असे वीर दिले. 


नाशिक पंचवटी भूमीला प्रणाम 


नाशिक पंचवटी भूमीत प्रभू श्रीरामाने अनेक काळ व्यतीत केला. मी आज या भूमीला श्रद्धापूर्वक प्रणाम करतो. मी आवाहन केलं होतं जानेवारीपर्यंत आपण सर्व २२ जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिराची साफसफाई करावी. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं. 


देशवासियांनी सर्व मंदिरात स्वच्छता अभियान राबवा 


मी देशवासियांना आग्रह करेन, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी देशातील सर्व मंदिरं, सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा. माझ्या युवा सहकाऱ्यांनो, आपल्या देशातील ऋषी मुनींपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी युवाशक्तीला सर्वोपरी ठेवलं. श्री अरविंदो म्हणाले, जर भारताला आपलं लक्ष्य गाठायचं असेल तर भारताच्या युवकांना एक स्वतंत्र विचाराने पुढे जावं लागेल.


स्वामी विवेकानंद म्हणायचे, भारताची आशा ही भारताच्या युवकांच्या बौद्धिकतेवर, त्यांच्या विचारावर अवलंबून आहे. या दिग्गजांचं मार्गदर्शन आजही प्रेरणादायी आहे. 


भारत टॉप 5 अर्थव्यवस्था 


आज भारत जगातील टॉप 5 अर्थव्यवस्था आहे. ही भारताच्या युवकांच्या ताकद आहे.आज भारत जगातील टॉप ३ इकोसिस्टिममध्ये आला आहे. 
आज भारत एकापेक्षा जास्त इनोवेशन करत आहे. भारत अनेक पेटंट फाईल करत आहे. भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे, त्याचा आधार हा युवक आहे.


तरुणाई ही देशाची शक्ती


सहकाऱ्यांनो वेळ ही प्रत्येकाला एक संधी देते. वेळेचा हा सुवर्णक्षण आताचा अमृतकाळाचा हा कालखंड आहे. तुमच्याकडे संधी आहे, इतिहास रचण्याची, इतिहासात तुमचं नाव नोंदवण्याची. 


दिग्गजांनी देशाला दिशा दिली


तुम्ही प्रयत्न करा, आजही आपण सर विश्वेश्वरायांच्या आठवणीत इंजिनिअर दिवस साजरा करतो. त्यांनी जे बाराव्या शतकात इंजिनिअरिंग कौशल्य दाखवलं ते आजही लाजवाब आहे. आजही आपण मेजर ध्यानचंद यांची जादूई हॉकीच्या प्रेमात आहोत. आजही आपण भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, चंद्रशेखर आझाद यांचे पराक्रम विसरलो नाहीत. 


आज आपण महाराष्ट्राच्या वीर भूमीवर आहोत. या भूमीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक शिक्षणाची दारं उघडली. या सर्व महानव्यक्तांनी देशासाठी आयुष्य वेचलं. हे सर्व जगले ते फक्त देशासाठी, स्वप्न बघितलं ते देशासाठी, संकल्प केले ते सुद्धा देशासाठी. या सर्वांनी देशाला नवी दिशा दिली. 


युवकांनी देशाला नव्या उंचीवर न्यावं


देशाच्या या अमृतकाळात युवकांनी भारताला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. येत्या कालखंडात तुम्ही असं काम करा की आगामी पिढ्या तुमच्या नावाचा गौरव करतील. 


मी तुम्हा सर्वांना २१ व्या शतकातील भारताची सर्वात सौभग्य पिढी मानतो. मला माहिती आहे, तुम्ही हे सर्व करु शकता. तुम्ही ठरवलं तर भारत लक्ष्य गाठू शकतो. माझा सर्वात जास्त विश्वास भारताच्या तरुणाईवर आहे. 


मी माझा युवा भारत ज्या वेगाने देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडला जात आहे, ते उत्साहवर्धक आहे.  मी सर्व युवकांचं विशेष अभिनंदन करतो.


दहा वर्षात तरुणाईला आकाश खुलं केलं 


आमच्या सरकारला १० वर्ष होत आहे. या काळात आम्ही पूर्ण प्रयत्न केला की युवकांना खुलं आकाश मिळावं, त्यांच्यासमोरील प्रत्येक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोजगार, शिक्षण, स्टार्टअप, स्किल असे सर्वकाही युवकांसाठी खुलं केलं. 


२१ व्या शतकात आधुनिक शिक्षणासाठी नवं शिक्षण धोरण आणलं. युवकांसाठी आधुनिक स्किल इकोसिस्टिम सुरु होत आहे. PM विश्वकर्मा योजना, pm कौशल विकास योजना आणून तरुणांना जोडलं. नव्या आयआयटी, नव्या आयआयएम आणलं जात आहे. विदेशातही आमचे युवक कौशल्य दाखवत आहे. सरकारही परदेशात जाणाऱ्या तरुणांना ट्रेनिंग देत आहे. 


अॅनिमेशन ते गेमिंग क्षेत्रांना प्रोत्साहन


अनेक देशांसोबत सरकारने जे करार केले आहेत, सरकार नव्या संधीसाठी पूर्ण शक्तीने काम करत आहे. सरकार आज अॅनिमेशन, व्हिजुअल्स इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक सेक्टर्सना प्रमोट करत आहे. अॅटोमिक सेक्टर, स्पेस यासारख्या क्षेत्रातही काम करत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मागील सरकारपेक्षा दुप्पट, तिप्पट काम केलं जात आहे. 


देशात जे मोठमोठे महामार्ग होत आहेत, विकासकामं होत आहेत, ते युवकासांठी आहे. लोक परदेशात गेल्यावर म्हणत होते भारतात हे सर्व कधी होणार. मात्र आता भारतातही हे सगळं होत आहे. 


कोरोनाकाळात जगाने भारताची ताकद पाहिली


कोरोनाकाळात जगाने भारताची ताकद बघितली. सर्व भारतीयांना वॅक्सीन देऊन त्यांना डिजीटल सर्टिफिकेट दिले. भारतात आज इतका स्वस्त मोबाईल डेटा उपलब्ध आहे, जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


देशाचा मिजास युवा आहे आणि देशाचा अंदाजही युवा आहे. जो युवा असतो तो मागे हटत नाही, आघाडीवर असतो. आज टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारत आघाडीवर नेतृत्व करत आहे. चांद्रयान, मेड इन इंडिया आएनएस विक्रांत अशा योजनांमुळे भारताचा उर अभिमानाने भरुन येतो.


जेव्हा लाल किल्ल्यावरुन मेड इन इंडिया तोफ धडाडते तेव्हा नवी चेतना निर्माण होते, भारतीय  तेजस फायटर प्लेन आकाशात उड्डाण करतं तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो. आज भारतात मोठ्या मॉलपासून छोट्या दुकानापर्यंत यूपीआय वापर केला जात आहे. हे सर्व बघून जग हैरान आहे. 
या अमृतकाळात तुम्हाला हे सर्व पुढे घेऊन भारताला विकसित बनवायचं आहे. 


आता आम्हाला केवळ समस्यांचं समाधान शोधणं नव्हे तर नवी आव्हानांचा सामना करायचा आहे. आपल्याला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनायची आहे. भविष्याबाबत आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत.  


तरुणांनी सक्रीय राजकारणात यावं, परिवारवाद संपेल


देशाची युवा पिढी तयार होत आहे, गुलामी आणि तणावापासून मुक्त आहे. आता युवा पिढी म्हणते विकास आणि विरासत. 
सरकारने अनेक योजना राबवून देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला. भारत ही लोकशाहीची माता आहे. जर तुम्ही सक्रीय राजकारणात आलात, तर परिवारवादाच्या राजकारणाला कमी कराल. परिवारवादाच्या राजकारणाने देशाचं नुकसान केलंय. 


युवक आपल्या लोकशाहीत उर्जा आणू शकतील. युवकांनी मतदारयादीत नाव आल्यानंतर देशासाठी मतदान करावं. देशाचा अमृतकाळ हा परिवर्तनकाळ आहे. 


तरुणांनी काही सूत्रावर ध्यान ठेवावं लागेल


मेड इन इंडिया प्रोडक्ट वापरा 
कोणतीही नशा, ड्रग्जपासून लांब राहा
माता, बहिणी, मुलींवर शिव्या देऊ नका, अपशब्द वापरू नका. 



देशातील प्रत्येक तरुण त्यांच्या निष्ठेने  सशक्त आणि सक्षम भारतासाठी प्रयत्न करेल, हा मला विश्वास आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi National Youth Festival Nashik : "आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिवस"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य

PM Narendra Modi National Youth Festival Nashik : आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिन आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घानाप्रसंगी ते बोलत होते. 

PM Modi Advice to Youth LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना चार मंत्र

PM Modi in Speech Nashik LIVE Updates :  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना चार मंत्र



  1. मेड इन इंडिया उत्पादनाचा उपयोग करा.

  2. मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका.

  3. आई-बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा.

  4. नवीन मतदारांनी मतदानासाठी नोंद करा.

PM Modi Speech LIVE Updates : आई-बहिणींवरून अपशब्द वापरू नका, पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन

PM Modi in Maharashtra Nashik Mumbai Visit LIVE Updates : आई-बहिणींवरून अपशब्द वापरू नका, असं आवाहनन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं आहे. तसेच युवांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.

PM Modi in Speech LIVE Updates : युवकांसाठी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न : पंतप्रधान मोदी

PM Modi in Speech LIVE Updates : युवकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सरकारपेक्षा जास्त वेगाने काम केलं, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे

PM Modi in Speech LIVE Updates : सध्याची पिढी सर्वात भाग्यवान पिढी : पंतप्रधान मोदी

PM Modi in Speech LIVE Updates : सध्याची पिढी सर्वात भाग्यवान पिढी : पंतप्रधान मोदी

PM Modi in Speech LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

PM Modi in Maharashtra Nashik Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?


माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो. 


हा केवळ योगायोग नाही, देशातील अनेक महान विभूतींचा संबंध महाराष्ट्राच्या धर्तीशी संबंध आहे. महाराष्ट्र ही वीरभूमी आहे. राजामाता जिजाऊसारखी मातृशक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नायकाला जन्म दिला. याच धर्तीने देवी अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकरसारख्या महान नारीशक्ती देशाला दिली. याच धर्तीने लोकमान्य टिळक, वीर सावरकर, दादासाहेब पोतनीस, चाफेकर बंधू, आनंद कन्हेरे असे वीर दिले. 


नाशिक पंचवटी भूमीत प्रभू श्रीरामाने अनेक काळ व्यतीत केला. मी आज या भूमीला श्रद्धापूर्वक प्रणाम करतो. मी आवाहन केलं होतं जानेवारीपर्यंत आपण सर्व २२ जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिराची साफसफाई करावी. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचं सौभाग्य मिळालं. 


मी देशवासियांना आग्रह करेन, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी देशातील सर्व मंदिरं, सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा. 


माझ्या युवा सहकाऱ्यांनो, आपल्या देशातील ऋषी मुनींपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी युवाशक्तीला सर्वोपरी ठेवलं. श्री अरविंदो म्हणाले, जर भारताला आपलं लक्ष्य गाठायचं असेल तर भारताच्या युवकांना एक स्वतंत्र विचाराने पुढे जावं लागेल.


स्वामी विवेकानंद म्हणायचे, भारताची आशा ही भारताच्या युवकांच्या बौद्धिकतेवर, त्यांच्या विचारावर अवलंबून आहे. या दिग्गजांचं मार्गदर्शन आजही प्रेरणादायी आहे. 


आज भारत जगातील टॉप ५ अर्थव्यवस्था आहे. ही भारताच्या युवकांच्या ताकद आहे.आज भारत जगातील टॉप ३ इकोसिस्टिममध्ये आला आहे. 
आज भारत एकापेक्षा जास्त इनोवेशन करत आहे. भारत अनेक पेटंट फाईल करत आहे. भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे, त्याचा आधार हा युवक आहे.


सहकाऱ्यांनो वेळ ही प्रत्येकाला एक संधी देते. वेळेचा हा सुवर्णक्षण आताचा अमृतकाळाचा हा कालखंड आहे. तुमच्याकडे संधी आहे, इतिहास रचण्याची, इतिहासात तुमचं नाव नोंदवण्याची. 


तुम्ही प्रयत्न करा, आजही आपण सर विश्वेश्वरायांच्या आठवणीत इंजिनिअर दिवस साजरा करतो. त्यांनी जे बाराव्या शतकात इंजिनिअरिंग कौशल्य दाखवलं ते आजही लाजवाब आहे.
आजही आपण मेजर ध्यानचंद यांची जादूई हॉकीच्या प्रेमात आहोत. आजही आपण भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, चंद्रशेखर आझाद यांचे पराक्रम विसरलो नाहीत. 


आज आपण महाराष्ट्राच्या वीर भूमीवर आहोत. या भूमीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक शिक्षणाची दारं उघडली. या सर्व महानव्यक्तांनी देशासाठी आयुष्य वेचलं. हे सर्व जगले ते फक्त देशासाठी, स्वप्न बघितलं ते देशासाठी, संकल्प केले ते सुद्धा देशासाठी. या सर्वांनी देशाला नवी दिशा दिली. 


देशाच्या या अमृतकाळात युवकांनी भारताला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. येत्या कालखंडात तुम्ही असं काम करा की आगामी पिढ्या तुमच्या नावाचा गौरव करतील.

PM Modi National Day : पंतप्रधानांकडून सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा

राष्ट्रीय युवा महोत्सवात देशातील युवकांना संबोधन करताना म्हटलं की, ''माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो.'' 

PM Modi Today Maharashtra Visit Live : युवकांकडे इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी : पंतप्रधान

PM Modi Speech Today Maharashtra Live Updates : देशातील युवांमध्ये इतिहास घडवण्याची ताकद आहे. युवकांकडे इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे. 

PM Modi Speech Live Update : देशातील सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता मोहिम राबवा : मोदी

PM Modi Speech Live Update : देशातील सर्व तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहिम राबवा, 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहिम राबवा : मोदी

PM Modi Speech Live Update : देशातील सर्व मंदिरात स्वच्छता मोहिम राबवा : मोदी

PM Modi Speech Live Update : देशातील सर्व मंदिरात स्वच्छता मोहिम राबवा : मोदी

PM Modi Speech Live Update : आजचा दिवस युवाशक्तीचा : पंतप्रधान मोदी

PM Modi in Nashik Live Update : आजचा दिवस युवाशक्तीचा : पंतप्रधान मोदी

PM Modi Speech Live Update : महाराष्ट्राच्या भूमीला मनापासून प्रणाम : पंतप्रधान मोदी

PM Modi Live Update : महाराष्ट्राच्या भूमीला मनापासून प्रणाम : पंतप्रधान मोदी

PM Modi Live Update : राजमाता जिजाऊंना कोटी-कोटी अभिवादन : पंतप्रधान मोदी

PM Modi Speech Live Update : राजमाता जिजाऊंना कोटी-कोटी अभिवादन करत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली.

PM Modi LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह

PM Modi LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह

CM Eknath Shinde Speech : मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून स्तुतीसुमने

PM Modi in Nashik Maharashtra Visit LIVE Updates : नाशिक: राम मंदिर (Ram Mandir)  बनवून मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray)  स्वप्न पूर्ण केले आहे. राम मंदिराअगोदर हा दौरा शुभ संकेत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी (PM Modi) लक्षद्वीपमध्ये गेले  आणि मालदीवमध्ये ( Lakshadweep Maldives controversy ) भूकंप आला, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.  

PM Modi Kalaram Mandir Pooja Video : पंतप्रधान मोदींच्या काळाराम मंदिरातील पूजेचा व्हिडीओ समोर

पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिरात पूजा केली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.


 





PM Modi in Nashik Visit LIVE Updates : पंतप्रधान मोंदींसमोर युवांकडून देशभरातील संस्कृतीचं प्रदर्शन

PM Modi in Maharashtra Visit LIVE Updates : पंतप्रधान मोंदींसमोर युवांकडून देशभरातील संस्कृती आण कलेचं सादरीकरण करण्यात आलं.

CM Eknath Shinde Live Updates : राष्ट्रीय युवा महोत्सवात मुख्यमंत्र्यांचं संबोधन

PM Modi in Maharashtra Nashik Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात देशाचा वेगाने विकास झाला आहे. देश एका महासत्तेच्या रुपात नावारुपाला येतेय, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आहे.

PM Modi Visit Live Updates : पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात देशातील युवांना संबोधित करणार

PM Modi in Nashik Maharashtra Visit LIVE Updates : थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवात देशातील युवांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

PM Modi Visit Live Updates : पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात देशातील युवांना संबोधित करणार

PM Modi in Nashik Maharashtra Visit LIVE Updates : थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवात देशातील युवांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

PM Modi National Youth Day in Nashik : तपोनव मैदानात राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन

PM Modi in Maharashtra Nashik Mumbai Visit LIVE Updates : तपोनव मैदानात राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री अनुगान ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. 

PM Modi in Nashik Live : स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिराबाहेर असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं.

PM Modi LIVE Updates : पंतप्रधानांचा ताफा तपोवनाच्या दिशेने

 PM Modi Maharashtra Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदींचा ताफा तपोवनाच्या दिशेने निघाला आहे. तपोवनातील मैदानावर 27 व्या युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

PM Modi in Kalaram Temple : असा आहे काळाराम मंदिराचा इतिहास ?

Nashik Kalaram Temple History : असा आहे काळाराम मंदिराचा इतिहास ?


प्रभू श्रीरामांनी पंचवटीत शुर्पनखाचे नाक,कान कापल्यानंतर 14 हजार राक्षस या ठिकाणी श्रीरामांवर हल्ला करण्यासाठी आले असता त्यावेळी प्रभू श्रीरामांनी छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केली आणि सर्व 14 हजार राक्षसांचा वध केल्याची अख्यायिका सांगितली जाते.


त्याप्रसंगी अत्यंत विराट आणि भव्य कालस्वरूप रूप  प्रभू  श्रीरामांनी धारण केलं होतं.


कालस्वरूप म्हणून श्री काळाराम नाव प्रसिद्ध झाले, त्यामुळे पुढे जाऊन श्री काळाराम मंदिर स्थापन झाले.


नाशिकजवळच्या टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य होते. ते गोदावरीत स्नान करत आणि काळारामाच्या दर्शनाला येत.


त्याकाळी हे मंदिर लाकडी होते. मात्र ,मूर्ती आज आहेत त्याच होत्या. अनेक श्लोक, करूणाष्टके, आरत्या यांच्या रचना समर्थांनी याच काळारामाच्या पुढ्यात केल्या आहेत.


काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले.

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान मोदींकडून काळाराम मंदिरात पूजा आणि आरती

PM Modi Kalaram Mandir Pooja Nashik LIVE Updates : पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिरात पूजा आणि आरती केली.

PM Modi Today Maharashtra Visit Live : पंतप्रधान मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात पूजा

PM Modi Today Maharashtra Visit Live : पंतप्रधान मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात पूजा

PM Modi in Kalaram Temple : पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेतलं

PM Modi Nashik Kalaram Mandir Visir : पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मोदींच्या हस्ते पूजा पार पडेल.

PM Modi in Maharashtra Nashik Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधानांच्या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व

अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व आहे. कारण प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना त्यांनी नाशिकच्या पंचवटी येथे वास्तव्य केलं होतं.

PM Modi Nashik Daura LIVE Updates : जलपुजनानंतर पंतप्रधान काळाराम मंदिरात

PM Modi in Nashik Maharashtra Tour LIVE Updates : जलपुजनानंतर पंतप्रधान काळाराम मंदिरात पोहोचले असून तेथे पुजा करतील.

PM Modi in Ramkund Jalpujan Nashik LIVE Updates : पंतप्रधानांकडून रामकुंड येथे जलपूजन

PM Modi in Nashik Maharashtra LIVE Updates : पंतप्रधानाकडून रामकुंड येथे जलपूजन सुरु आहे. रामकुंड येथे जलपूजनाला खास महत्त्व आहे. येथे जलपूजन केल्यावर आपली पापं दूर होतात, असं मानलं जातं.

PM Modi in Nashik Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्टीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

PM Modi in Nashik Maharashtra LIVE Updates : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर (Maharashtra) सोपविण्यात आली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. या महोत्सवात 8 हजार युवक सहभागी होतील. उद्घाटन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

PM Modi in Ramkund Nashik LIVE Updates : रामकुंडमध्ये जलपूजन करणार

PM Modi in Nashik Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान मोदी रामकुंडमध्ये जलपूजन करणार आहेत.

PM Modi in Kalaram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी राम कुंडावर दाखल

PM Modi in Nashik Visit LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंडावर पोहोचले आहेत.

PM Modi in Nashik Maharashtra Daura LIVE Updates : भव्य रोड शोमध्ये जय श्रीराम अशी घोषणाबाजी

पंतप्रधान मोदी यांचा नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुमारे दीड किलोमीटरच्या भव्य रोड शोमध्ये जय श्रीराम अशी घोषणाबाजी करण्यात आली.

PM Modi in Nashik Tour, Maharashtra Live Updates : रोड शोमध्ये पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी

PM Modi in Maharashtra Nashik Mumbai Visit LIVE Updates : नाशिकच्या भव्य रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

PM Modi Nashik Road Show : पंतप्रधानांचा रोड शो पाहण्यासाठी तुफान गर्दी

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान मोदी यांचा रोड शो सुरु असून रोड शो पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे. रोड शोनंतर पंतप्रधान रामकुंडावर पोहोचतील. 

PM Modi in Nashik Daura LIVE Updates : पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी नाशिककरांची गर्दी

PM Modi in Maharashtra Nashik Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी नाशिककरांची विमानतळापासून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे.

PM Modi Road Show in Nashik LIVE Updates : पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोला सुरुवात

PM Modi in Maharashtra Visit LIVE Updates : नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे.



PM Modi in Nashik : पंतप्रधान मोदीचं ओझर विमानतळावर आगमन

PM Modi in Maharashtra Daura LIVE Updates : वायूदलाच्या खास विमानाने ओझर, नाशिक विमानतळावर पंतप्रधान मोदींचं आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत फोटो शेअर केले आहेत. 





PM Modi in Nashik Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिककरांची गर्दी

PM Modi in Nashik Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाले असून स्वागतासाठी नाशिककरांची गर्दी झाली आहे.

PM Modi in Maharashtra Nashik Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल, राज्याला देणार 30 हजार कोटींची भेट

 PM Modi in Maharashtra Nashik Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदी यांचं नाशिकमध्ये आमगन झालं आहे. हेलिपॅडवर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि तिन्ही मुख्यमंत्री उपस्थित आहेत. 

PM Modi In Maharashtra : पंतप्रधान मोदी राज्याला 30 हजार कोटींची भेट

PM Modi in Maharashta Nashik Mumbai Visit LIVE Updates : आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी मुंबईत जवळपास 30 हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, बेलापूर-पेंधर नवी मुंबई मेट्रो-1चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे.

PM Modi Nashik Visit Dada Bhuse Dance : पालकमंत्री दादा भुसे यांनी ढोल ताशांच्या तालावर केला नाच

PM Modi in Maharashta Nashik Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्या निमित्ताने युवक नाशिककर सर्वामध्ये आनंद उत्साहातचे वातावरण आहे, आलेल्या युवकांचा उत्साह वाढविताना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी ढोल ताशांच्या तालावर तीन पावली नाच करून आनंद साजरा केला.

PM Modi Nashik Visit : नाशिकला आज पर्वणी! मोदींचा रोड शो, राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम अन् बरंच कांही...

PM Narendra Modi Nashik Visit : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर (Maharashtra) सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये (National Youth Festival in Nashik) होत असल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे. शुक्रवारी नाशिककर जणू पर्वणीचाच अनुभव घेणार आहे. पंतप्रधान मोदींचा रोड शो, राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम अन् बरंच कांही पाहायला मिळणार आहे.

PM Modi in Nashik Visit LIVE Updates : मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री हेलिपॅडकडे रवाना

PM Modi in Maharashta Nashik Mumbai Visit LIVE Updates : नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेलिपॅडकडे रवाना झाले आहेत. यावेळी तिघांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. 

PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकच्या 'रोड शो'साठी पंतप्रधानांची खास गाडी पाहिलीत का?

PM Modi Nashik Roda Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा रोड शो होणार आहे. संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची (PM Narendra Modi Road Show in Nashik) आतुरतेने वाट पाहत आहेत. मोदींच्या रोड शो साठी एक खास कार तयार करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या भव्य रोड शोसाठी एक खास आलिशानमध्ये गाडी सजवण्यात आली आहे.


ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

PM Modi in Maharashta Nashik Mumbai Visit LIVE Updates : पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे नाशिकमध्ये उत्साहाचं वातावरण

PM Modi in Nashik Visit LIVE Updates : नाशिकमध्ये होणाऱ्या युवा महोत्सवाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असून या निमित्ताने नाशिकमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान मोदींच्या सभास्थळावरुन तयारीचा आढावा

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान मोदींच्या सभास्थळावरुन तयारीचा आढावा


 


आज नाशिकच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करणार 11 दिवसांचे अनुष्ठान

आज नाशिकच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापनेसाठीचं 11 दिवसांचं अनुष्ठान सुरू करणार आहेत. 22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वीचे अनुष्ठान नरेंद्र मोदी आजपासून सुरू करणार आहेत. अनेक साधू संत, विद्वानांनी सांगितलेल्या नियमांचे पालन पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून करणार आहेत.

PM Modi in Maharashta Nashik Mumbai LIVE Updates : नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो

PM Modi in Nashik Visit LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते शुक्रवारी नाशिकच्या तपोवन येथील मोदी मैदानावर (Modi Maidan) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा रोड शो देखील होणार आहे. संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची (PM Narendra Modi Road Show in Nashik) आतुरतेने वाट पाहत आहेत.   पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा रोड शो नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची सर्कलपासून (Mirchi Circle Nashik) ते जनार्दन स्वामी मठ चौकापर्यंत (Janardhan Swami Math Nashik) होईल. महामार्गावरील एका बाजूने रोड शो तर दुसऱ्या बाजूने सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे एक ते दीड लाख लोक या रोड शोला उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुमारे 1.2 किमीचे रोड शोचे अंतर असेल. 

PM Modi in Maharashta LIVE Updates : मुंबईत ट्रान्स-हार्बर लिंकचं उद्घाटन

PM Modi In Maharashtra : मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, बेलापूर-पेंधर नवी मुंबई मेट्रो-१चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे.



 

PM Narendra Modi : मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात कुठल्या प्रकल्पांचं उद्घाटन होणार?

PM Modi in Maharashta Nashik Mumbai LIVE Updates : पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात कुठल्या प्रकल्पांचं उद्घाटन होणार?


PM Narendra Modi Nashik Visit : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल

नुकतेच राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकला दाखल झाले आहेत. ते थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर दाखल होणार आहेत. नाशिकमध्ये आज 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच नाशिक येथे मोदींचा भव्य रोड शो देखील होणार आहे.  

PM Modi in Navi Mumbai Visit LIVE Updates : नवी मुंबई, पनवेल , उरणकरांसाठी आजचा ऐतिहासिक दिवस

PM Modi in Maharashta Nashik Mumbai LIVE Updates : नवी मुंबई, पनवेल , उरण करांसाठी आजचा ऐतिहासिक दिवस


आज पंतप्रधान शिवडी न्हावा शेवा अटल सेतू, उरण - सिवूड रेल्वे मार्ग आणि बेलापूर - पेंधर मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. आजच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सव्वालाख महिला आणि भाजपा कार्यकर्ते मिळून दीड लाखांहून जास्त नागरिक या कार्यक्रमात सहभागी होतील. सभेच्या ठिकाणी प्रभू श्रीराम, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांचे कट आऊटही उभे करण्यात आले आहेत. स्टेजच्या उजव्या बाजूला मोदी, बाळासाहेब ठाकरे तर डाव्या बाजूला अमित शाह, आनंद दिघे यांचे मोठे कटाऊट लावले आहेत. शेकडो एकर जागेवर भला मोठा मंडप उभा केला आहे. पंडालच्या सर्व बाजूने श्रीरामाचे मोठे कटाआऊट लावण्यात आले आहेत.

PM Modi in Maharashta Visit LIVE Updates : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल

PM Modi in Maharashta Nashik Mumbai LIVE Updates : पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अदित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

PM Modi Atal Setu Inauguration : अटल सेतू उद्घाटनाकरता सज्ज

अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू उद्घाटनाकरता सज्ज आहे.



  • पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा पुलाचे उद्घाटन होणार आहे.. 

  • मुंबई-नवी मुंबई-रायगडला जोडणारा हा पूल महाराष्ट्राकरता विकासाचा नवा सेतू ठरतोय.

  • मोदींच्या दौऱ्यानिमित्ताने या परिसरात विशेष सुशोभिकरण आणि चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • मोदींच्या स्वागताकरता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तीनही पक्षांचे झेंडे अटल सेतु वर लावण्यात आले आहेत.

PM Modi in Maharashta Nashik Mumbai LIVE Updates : महाराष्ट्र दौऱ्याआधी पंतप्रधानांचा देशवासियांना खास संदेश

PM Modi in Maharashta Nashik Mumbai LIVE Updates : महाराष्ट्र दौऱ्याआधी पंतप्रधानांचा देशवासियांना खास संदेश





PM Modi Nashik Tour : नाशिकमध्ये रोड शो, रामकुंडावर जलपूजन, काळाराम मंदिरात दर्शन

PM Modi in Nashik : आज नाशिकमध्ये पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे. पंतप्रधान रामकुंडावर जलपूजन करतील यासोबतच काळाराम मंदिरात दर्शनही घेतील.


 


PM Modi in Maharashta LIVE Updates : अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं उद्घाटन

PM Modi in Maharashta Nashik Mumbai LIVE Updates : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं उद्घाटन पार पडणार आहे. नागरिकांसाठी शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतुक सुविधा अधिक बळकट करून ‘सुलभ गतिशीलतेला’ चालना देणे, पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अनुषंगाने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून त्याचे नाव आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते डिसेंबर 2016 मध्ये झाली होती.

PM Modi Maharashta Visit LIVE Updates : 2000 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण

PM Modi in Maharashta Nashik Mumbai LIVE Updates : आज पंतप्रधान सुमारे 2000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यामध्ये ‘उरण-खारकोपर रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा’ समावेश आहे, ज्यामुळे नवी मुंबईशी स्थानिक संपर्क अधिक वाढेल. यामध्ये नेरुळ/बेलापूर ते खारकोपर दरम्यान असलेल्या उपनगरीय रेल्वेसेवा आता उरणपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या ईएमयू रेल्वेगाडीला हिरवी झेंडा दाखवून त्याचंही उदघाटन  पंतप्रधान करतील. याशिवाय ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीन उपनगरीय स्थानक ‘दिघा गाव’ तसेच खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान नवीन सहावा रेल्वेमार्ग या रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण केलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईतील हजारो प्रवाशांचा दैनंदिन रेल्वेप्रवास सुलभ होणार आहे.

PM Modi in Maharashta Nashik Mumbai LIVE Updates : शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणिकार्यकर्ते स्थानबद्ध 

PM Modi in Nashik LIVE Updates : युवा महोत्सवासाठी नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी निर्यातबंदी संदर्भात कांदा उत्पादक शेतकरी संघटनांकडून विरोध दर्शवला जावू शकतो या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकडून स्थानबद्ध केलं गेलं आहे. काल रात्री उशिरापर्यंत या कांदा उत्पादक शेतकरी संघटना, प्रहार, स्वाभिमानी आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शोधाशोध पोलिसांकडून सुरूच होती. सध्या केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविषयी नाराजी आहे, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला जाईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिल्यानंतर खबरदारी म्हणून पदाधिकाऱ्यांना नोटिसा देत स्थानबद्ध करण्यात आले.

PM Modi in Maharashta Visit LIVE Updates : शेतकरी नेते अनिल घनवट स्थानबद्ध

अहमदनगर : शेतकरी नेते आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांना स्थानबद्ध केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना स्थानबद्ध करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचे आवाहन घनवट यांनी केले होते. कांदा निर्यात बंदी उठवावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा, सरकारी हस्तक्षेप थांबवावा ही घनवट यांची मागणी आहे. मोदींच्या दौऱ्याला विरोध करणार असल्याने घनवट यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावरून नाशिकच्या निलगिरी बाग येथे तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर साधारण 10 वाजेच्या सुमारास आगमन होणार आहे, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. 

PM Modi in Nashik LIVE Updates : 12 बॉम्ब शोध पथके नाशिकमध्ये, विविध भागात तपासणी

PM Modi in Maharashtra LIVE Updates : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून होणार आहे.  पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून 12 बॉम्ब शोध पथकं ही नाशिक शहरात दाखल झाली असून, ज्या-ज्या ठिकाणी व्हीआयपीची मुव्हमेंट आहे, त्या प्रत्येक ठिकाणांची या पथकाद्वारे तपासणी करण्यात येते. हॉटेल, रस्ते किंवा हेलिपॅड आणि विमानतळ या प्रत्येक ठिकाणची तपासणी सध्या या पथकाकडून करण्यात येत असून नाशिक शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचं दिसून येतंय.

PM Modi in Nashik LIVE Updates : शासकीय विश्राम गृहाला छावणीचे स्वरूप, श्वान पथक, बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी

नाशिक : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सर्वत्र सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींसह विविध मंत्र्यांचा राबता राहणार असल्याने विश्रामगृह येथे देखील छावणीचे स्वरूप आले आहे. श्वान पथक, बॉम्ब शोध पथक आदीकडून परिसराची तपासणी करण्यात येत आहे. 

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ

PM Modi in Nashik LIVE Updates : सिप्झ विशेष आर्थिक क्षेत्र(SEEPZ- SEZ) येथील नवीन उपक्रम आणि सेवा केंद्र (NEST)- याचेही  उदघाटन पंतप्रधान करणार आहेत. NEST – 01 हे प्रामुख्याने रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी सुरू केलेले केंद्र आहे, जे सध्या स्टँडर्ड डिझाइन फॅक्टरी-I येथे आहे. उद्योगाच्या मागणीनुसार, तसेच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी हे नवीन केंद्र तयार बांधण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 'नमो महिला सशक्तीकरण अभियाना'चा शुभारंभ करतील. या अभियानाचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आणि उद्योजकता विकासासाठी सक्षम करणे हा आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या महिला विकास कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि परिपूर्णता यासाठी या अभियानाद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. 

PM Modi in Maharashtra LIVE Updates : 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव

PM Modi in Nashik LIVE Updates : देशाच्या विकासाच्या प्रवासात युवावर्गाला प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधान सतत प्रयत्नशील असतात. या प्रयत्नातील  आणखी एक पाऊल म्हणून, पंतप्रधान आज नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (NYF) उदघाटन करतील. दरवर्षी 12 ते 16 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सव (National Youth Day) आयोजित केला जातो. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन (Swami Vivekananda Birth Anniversary) आहे. 

PM Modi in Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा कसा असेल?

पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा कसा असेल?


• सकाळी 10  वाजता नाशिक विमानतळ येथे आगमन
• सकाळी 11 ते 12 वाजता काळाराम मंदिर येथे पूजा आणि दर्शन
• दुपारी 12 ते 2 राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रम तपोवन ग्राऊंड, नाशिक
• दुपारी 2 वाजता तपोवन मैदानाकडून हॅलिपॅडकडे
• दुपारी 2.10 वाजता- नाशिक हॅलिपॅडवरुन आयएनएस  शिक्रा हॅलिपॅड कुलाबासाठी रवाना
• दुपारी 3.10 वाजता आयएनएस शिक्रा वरुन एमटीएनएल स्टार्टींग पाॅईंटकडे रवाना
• दुपारी 3.30 वाजता- एमटीएचएल सागरी सेतुच उद्घाटन आणि मोटारीने प्रवास
• दुपारी 4.10 वाजता- एमटीएचएल एंड पॉईंट कडून नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळ मैदानाकडे प्रयाण
• दुपारी 4.15 वाजता- नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळ मैदानावरील विविध उद्घाटनाला सुरुवात
• सायंकाळी 5.35 वाजता- नवी मुंबई विमानतळावरून हॅलिपॅडकडे प्रयाण
• सायंकाळी 5.40 वाजता - नवी मुंबई हॅलिपॅडकडून मुंबई विमानतळ प्रयाण 
• सायंकाळी 6.10 वाजता मुंबई विमानतळावरुन दिल्लीला रवाना

PM Modi in Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान मोदींचा नाशिक दोरा

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान मोदी यांचं आज सकाळी 10 च्या सुमाराला नाशिक (Nashik) येथे आगमन होणार असून येथे ते  27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन ((PM to inaugurate 27th National Youth Festival)) करणार आहेत.  पंतप्रधान  दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे ((Atal Bihari Vajpayee Sewri – Nhava Sheva Atal Setu)) उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. 

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधानांच्या हस्ते 27 व्या युवा महोत्वाचं उद्घाटन

National Youth Festival : पंतप्रधानांच्या हस्ते आज नाशिकमध्ये 27 व्या युवा महोत्वाचं उद्घाटन पार पडणार आहे.

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमात सहभागी

PM Modi in Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता नाशिकमध्ये पोहोचतील. त्यानंतर 11 ते 12 वाजेदरम्यान काळाराम मंदिरात पूजा आणि दर्शन घेतील. दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान तपोवन ग्राऊंडवर राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमात सहभागी होतील.

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमात सहभागी

PM Modi in Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता नाशिकमध्ये पोहोचतील. त्यानंतर 11 ते 12 वाजेदरम्यान काळाराम मंदिरात पूजा आणि दर्शन घेतील. दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान तपोवन ग्राऊंडवर राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमात सहभागी होतील.

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान मोदीचं सकाळी 10 वाजता नाशिक विमानतळावर आगमन

PM Modi in Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता नाशिक विमानतळावर दाखल होतील.

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

PM Modi in Nashik LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज 12 जानेवारीला महाराष्ट्राच्या (Maharashtra ) दौऱ्यावर येत आहेत.

पार्श्वभूमी

Atal Bihari Vajpayee Sewari Nhava Sheva Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नाशिकमधील युवा महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर, ते मुंबईकडे रवाना झाले.  त्याआधी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा केली.  पंतप्रधानांच्या हस्ते शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं  उद्घाटन केलं. 12 जानेवारी हा दिवस देशात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.स्वामी विवेकानंद जी यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त आज 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये साजरा केला जात आहे. 


माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो, असं मोदी नाशिकमध्ये म्हणाले. 


शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं  उद्घाटन


मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात आलं. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी अडीचशे रुपये टोल आकारण्यात येणार आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.