मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना एकत्रित काम करण्याची ऑफर दिली होती अशी धक्कादायक बातमी शरद पवार यांनी एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत दिली. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि शेतीच्या नुकसानासंबंधित चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली होती, या भेटीवेळी एकत्रित काम करण्याची ऑफर पंतप्रधानांनी त्यांना दिली, असं पवारांनी म्हटलं. मात्र शरद पवारांनी ऑफर नाकारल्याची माहिती पवारांनी एबीपी माझाला दिली आहे.


अतिवृष्टीच्यासंदर्भात बोलणं झाल्यानंतर पंतप्रधानांनी पवारांना थांबण्यास सांगितलं आणि हा प्रस्ताव पवारांसमोर ठेवला, आपण एकत्रित काम केल्यावर आनंद होईल असं मोदी म्हणाले, मात्र पवारांनी ही ऑफर नाकारत असं म्हटलं की "आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत ते राहतीलही पण आपण एकत्र काम करणं मला राजकीय दृष्ट्या शक्य नाही'.


"विकासाच्या संदर्भात, उद्योगाच्या संदर्भात, शेतीबद्दल आपली मतं, भूमिका काही वेगळी नाहीl, मग मतभिन्नता कुठेय? असा सवाल मोदींनी त्यांचा मुद्दा पटवत केला, तुम्ही विरोधकांनीही आमच्यासोबत एकत्र येऊन देशासाठी काम करावं असंही ते म्हणाले. यावर पवारांनी असं उत्तर दिलं की "विरोधकांची विरोध करण्याची भूमिका माझ्याकडून कधी घेतली जाणार नाही, त्यामुळे त्याची चिंता नको". "एकत्रित येण्याचा तुमचा आग्रह मी नाही स्वीकारु शकत, मी एक लहानसा पक्ष चालवतो, आमच्या पक्षातील नेत्यांना मी जी दिशा दिली आहे ती काही आता बदलणं शक्य नाही", असंदेखील शरद पवार म्हणाले.


भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांच्या या मुलाखतीनंतर मोदींबद्दलच्या वक्तव्यावर एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे, "पवार साहेब अतिशय प्रगल्भ नेते आहेत आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, त्यामुळे या मोठ्या नेत्यांमधील चर्चा काय झाली हे मी सांगू शकत नाही, पण अशा प्रकारे मुलाखतीत चर्चेच्या संदर्भात बोलणं खरंच योग्य आहे की नाही" असा प्रश्न मुनगंटीवारांनी केला. विधानसभेत सभागृहात सदस्य नसणाऱ्या नेत्याबद्दल बोलण्यासाठीचे जसे नियम आहेत तसे व्यक्तिच्या संदर्भात, याचं खंडन मोदीजी करु शकणार नाहीत त्यामुळे बातमी एकतर्फी जाईल


शरद पवारांनी सांगितलेली ही गोष्ट ही एक बाजू झाली, पंतप्रधान मोदी याबाबत बोलून नियमांचं खंडन करणार नाहीत त्यामुळे ही बातमी एकतर्फी ठरेल. मात्र अशा विषयावर सार्वजनिकरित्या भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही असं मुनगंटीवार म्हणाले. असा कोणताही प्रयत्न भाजपच्या कोअर कमिटीमध्ये झाला नाही, अशी चर्चादेखील झाली नाही, थेट पंतप्रधान मोदींनी पवारांशी अशी चर्चा केली असेल, त्यामुळे ही दोन मोठ्या नेत्यांमधील चर्चा असल्याने मी यातलं काही सांगू शकणार नाही. राजकीय दृष्टीकोनातून दोन बड्या नेत्यांच्या व्यक्तिगत चर्चेचा भाग असा जाहीररित्या सांगणं योग्य नाही असं मला वाटतं असं सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं.


संबंधित बातम्या


Sharad Pawar | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनण्यास तयार नव्हते : शरद पवार


अजित पवारांनी 'त्या' अटीवर भाजपशी हातमिळवणी केली होती : शरद पवार


Sharad Pawar Exclusive | शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी सोनिया गांधींना 'या' गोष्टींची आठवण करुन दिली : शरद पवार


SPECIAL REPORT | ऐंशी तास आणि शरद पवारांचा पॉवर प्ले! | ABP Majha




Special Report | सत्तानाट्याचे 80 तास, पवारांच्या 'पावर'गेममुळे भाजप धोबीपछाड | ABP Majha