सध्या ग्रामीण भागामध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात घरकुल दिले जात आहे. घरकुल यादीमध्ये आपले नाव आले की नाही? हे कसे चेक करायचे? याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना पक्के घरे देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
01.घरकुल यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुगलवर
- pmayg.nic.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर खाली आलेला लिंक वर क्लिक करा.
- होमपेजवर वरच्या मेनूमधील “Awassoft” वर क्लिक करा.
- Scheme Type मध्ये PRADHAN MANTRI AWAAS Yojana निवडा.
- कॅप्चा कोड भरून “Submit” वर क्लिक करा.
आता तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर दिसेल. यामध्ये कोणाला घर मंजूर झाले आहे, कोणती स्टेज सुरू आहे इ. तपशील मिळतील.
तुम्हाला जर घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा असेल येथे क्लिक करा.
