ग्रामीण भागात सरकारकडून घरकुल दिले जात आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे. पण घरकुलसाठी अर्ज नेमका कसा करायचा? त्यासाठी कागदपत्र नेमकी कोणती? सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
- सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोर वरून 'आवास प्लस' आणि RD FACE हे दोन एप्लीकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर आवास प्लस ॲप ओपन करा. इथे तुम्हाला सिटीजन बेनिफिशरी युजर हा दुसरा पर्याय निवडायचा आहे.
-तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला तुमचा फोटो व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही फ्रंट किंवा बॅक कॅमेऱ्याचा वापर करू शकता.
-व्हेरिफाय झाल्यावर तुम्हाला इथे एक पिन तयार करायचा आहे. पिन तयार केल्यानंतर तुमचा लॉगिन सक्सेसफुल झालं आहे.
-आता तुम्हाला एकूण आठ स्टेप पूर्ण करायचा आहेत. त्यात पहिली स्टेप 'ऍड्रेस डिटेल्स'ची आहे.
-इथे तुम्हाला तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तहसील, ग्रामपंचायत निवडायची आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक करा.
-आता दुसरी स्टेप्समध्ये तुम्हाला कुटुंबाची माहिती द्यायची आहे.
-तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नावाने घरकुल हवं आहे. त्याचं नाव, आधार कार्ड नंबर, जॉब कार्ड नंबर, वय, उत्पन्न किती?अशी सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे.
-तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहे याची माहिती द्यायची आहे.
-चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला बँकेचा तपशील द्यायचा आहे. त्यात तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, IFSC कोड, ब्रांच कोड अशी माहिती भरायची आहे.
-आता तुमच्यासमोर पाचवी स्टेप ओपन होईल. यात तुम्हाला तुमच्या घराचा तपशील भरायचा आहे. तुम्ही सध्या राहत असलेलं घर भाड्याने आहे की , स्वतःच्या मालकीचं. घराची स्थिती कशी आहे. किती खोल्या आहेत. यासोबत तुमच्याकडे वाहन कोणतं? ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे.
-सहाव्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या घराचे काही फोटो अपलोड करायचे आहे. फोटो अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला save अँड नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे.
-सातव्या स्टेपमध्ये तुम्हाला काही घराचे नमुने दाखवण्यात येईल. तुम्हाला कसं घर हवय ते निवडा. त्यानंतर सेव अँड नेक्स्ट वर क्लिक करा.
-आठव्या स्टेपमध्ये तुम्हाला सर्वे रिव्यू करायचा आहे. डिक्लेरेशनवर सिलेक्ट करून save अँड नेक्स्ट करा.
-आता तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल्स आली असेल.
-खाली तुम्हाला आधार कार्ड आणि जॉब कार्ड व्हेरिफाय करायचा आहे. त्यासाठी व्हेरिफाय आधार यावर क्लिक करा. आणि नंतर व्हेरिफाय जॉब कार्ड यावर क्लिक करा.
-दोन्ही व्हेरिफाय झाल्यानंतर survey saved successfully असं मेसेज येईल. याचा अर्थ तुम्ही घरकुलचा फॉर्म तुमच्याकडून पूर्ण भरला आहे. आता याची पुढची प्रोसेस ग्रामपंचायत स्तरावर केली जाईल. त्यानंतर घरकुल यादीमध्ये तुमचं नाव येईल.
तर मंडळी तुम्हाला ही 'कामाची गोष्ट' कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.