मुंबई : राज्यात आजपासून (23 जून) प्लास्टिक बंद होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत काल पार पडलेल्या आढावा बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आजपासून तुम्ही प्लास्टिक वापरल्यास पाच हजार रुपयांचा दंड बसणार आहे. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांकडून या निर्णयावर टीकाही होत आहे.


हायकोर्टात दाद मागण्यासाठी अवधी

उच्च न्यायालयानेही प्लास्टिकबंदीबाबत व्यापाऱ्यांना कुठलाही दिलासा दिला नाही. राज्य सरकारच्या अध्यादेशाबाबत दाद मागण्यासाठी तीन आठवड्याचा अवधीही उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, 20 जुलैला अंतिम सुनावणीची तारिख ठरवली जाईल, असेही उच्च न्यायालयाने सांगितलं.

गुजरातमधून दबाव होता?

मुंबईत येणार प्लास्टिक हे गुजरातमधून येतं. गुजरातमधील लोक प्लास्टिकचे व्यापारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दवाब येण्याची शक्यता होती, असे राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचं मुंबईत प्रदर्शन

मुंबईत काल प्लास्टिकला पर्यायी वस्तूचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. या कार्यक्रमाला युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची उपस्थिती होती. वरळीतल्या एनएससीआय स्टेडियवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कोणत्या प्लास्टिकवर बंदी?

सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (यात मायक्रॉन, साईजच्या मर्यादा नाहीत), चहाचे कप, सरबतचे ग्लास, थर्माकोल ग्लास, डेकोरेसन थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक (डब्बे, चमच, पिशवी), फरसाण, नमकीन यांसाठची पदार्थांची आवरणं (यात उत्पादक कंपन्या पॅकिंगसाठी वापरणाऱ्या प्लास्टिकचा यात समावेश नाही).

वीरेन शहा यांचे आरोप

पर्यावरण मंत्रालयाच्या या निर्णयावर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. पर्यावरण मंत्रालयाने ब्रँडेड कंपन्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा शहा यांचा आरोप आहे. त्यांनी यासंदर्भात काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

या प्लास्टिकवर होणार बंदी -

- चहा कप
- सरबत ग्लास
- थर्माकोल प्लेट
- सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल
- हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक (प्लस्टिक डब्बे, चमचे, पिशवी)
- उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक

या प्लास्टिकवर कारवाई होणार नाही -

- उत्पादनासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक आणि थर्माकोल
- हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉटल्स, औषधांचे आवरणं
- प्लस्टिक पेन
- दुधाच्या पिशव्या (50 मायक्रॉनच्या वर)
- रेनकोट
- अन्नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणार प्लस्टिक
- नर्सरीमध्ये वापरण्यात येणारं प्लास्टिक
- टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यांसारख्या उत्पादनांना पॅकिंग करताना वापरण्यात येणार थर्माकोल आणि प्लास्टिक
- बिस्कीट, चिप्स अशा पदार्थांची प्लास्टिक आवरणं

संबंधित बातम्या :

राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदी, प्लास्टिक बाळगल्यास 5 हजारांचा दंड

23 जूनपासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी  

प्लास्टिकबंदीचं धोरण दुटप्पी, वीरेन शाहांकडून प्रश्न उपस्थित