यामध्ये बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे.
या तिघांवर माढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी माढा न्यायालयात केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आज रात्री उशिरा माजी खासदार संदिपान थोरात, आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्यार भा.दं.वी. कलम 409, 420, 464, 465 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.