मुंबई: राज्यात उद्या म्हणजेच 23 जूनपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी लागू होणार आहे. उद्यापासून तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तुम्हाला तब्बल 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे.
दुसरीकडे दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
सर्वसामान्यांसाठीचा हा दंड 200 रुपयापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळला. त्यामुळे आता मुंबईतही प्लास्टिक वापरणाऱ्यांवर 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काही व्यापाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
कोणत्या प्लास्टिकवर बंदी?
सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (यात मायक्रॉन, साईजच्या मर्यादा नाहीत), चहाचे कप, सरबतचे ग्लास, थर्माकोल ग्लास, डेकोरेसन थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक (डब्बे, चमच, पिशवी), फरसाण, नमकीन यांसाठची पदार्थांची आवरणं (यात उत्पादक कंपन्या पॅकिंगसाठी वापरणाऱ्या प्लास्टिकचा यात समावेश नाही).
वीरेन शहा यांचे आरोप
पर्यावरण मंत्रालयाच्या या निर्णयावर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. पर्यावरण मंत्रालयाने ब्रँडेड कंपन्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा शहा यांचा आरोप आहे. त्यांनी यासंदर्भात काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
या प्लास्टिकवर होणार बंदी -
- चहा कप
- सरबत ग्लास
- थर्माकोल प्लेट
- सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल
- हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक (प्लस्टिक डब्बे, चमचे, पिशवी)
- उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक
या प्लास्टिकवर कारवाई होणार नाही -
- उत्पादनासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक आणि थर्माकोल
- हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉटल्स, औषधांचे आवरणं
- प्लस्टिक पेन
- दुधाच्या पिशव्या (50 मायक्रॉनच्या वर)
- रेनकोट
- अन्नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणार प्लस्टिक
- नर्सरीमध्ये वापरण्यात येणारं प्लास्टिक
- टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यांसारख्या उत्पादनांना पॅकिंग करताना वापरण्यात येणार थर्माकोल आणि प्लास्टिक
- बिस्कीट, चिप्स अशा पदार्थांची प्लास्टिक आवरणं
संबंधित बातम्या
23 जूनपासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी
प्लास्टिकबंदीचं धोरण दुटप्पी, वीरेन शाहांकडून प्रश्न उपस्थित
राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदी, प्लास्टिक बाळगल्यास 5 हजारांचा दंड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2018 08:18 AM (IST)
उद्यापासून तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तुम्हाला तब्बल 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -