Pune School Bus :  पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल बस चालकांची (Pune School Bus News) बेपर्वाई सुरुच असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मोशी येथील एक्सिलंस शाळेच्या स्कूल बसमध्ये तब्बल 92 विद्यार्थी बसविण्यात आले आहे. या प्रकारामुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. 42  विद्यार्थी वाहतुकीची क्षमता असताना तब्बल 92 विद्यार्थी बसविण्यात आले.  या प्रकरणी पिंपरी चिंचवड आरटीओने बस चालकाला 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बसमध्ये एवढे विद्यार्थी का बसवले याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजली नाही आहे.


मोशी येथील एक्सिलंस शाळेच्या स्कूल बसमध्ये तब्बल 92 विद्यार्थी बसविण्यात आले. बसमध्ये विद्यार्थ्यांना श्वासही घेता येणार नाही, अशा पद्धतीने हे विद्यार्थी कोंबाण्यात आले होते. दरम्यान  पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी या बसला पकडून त्यावर कारवाई केली आहे. संबंधित स्कूलच्या मुख्याध्यापकांना घटनास्थळी बोलावून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली. मोशी भागात नुकतीच ही कारवाई करण्यात आली आहे. बस चालकाला 13 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


पुण्यात सध्या बसचालकांकडून असा प्रकार वारंवार समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीदेखील स्कूल बसच्या चालक आणि महिला केअर टेकर यांच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षाची मुलगी सुमारे तीन तास बंद बसमध्येच अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील कल्याणी नगर येथील बिशप को-एड स्कूलमधील एका विद्यार्थीनीसोबत हा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पुण्यातील लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. 


मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ....


आपल्या पाल्यांनी सुरक्षितरित्या शाळेत जावं, यासाठी पालक बसचा वापर करतात. बसचं मोठं भाडंही मोजतात. मात्र बसचालकांकडून अशा प्रकारची बेपर्वाई करण्यात येते. आतापर्यंत पुण्यात अनेकदा स्कुल बसच्या घटना समोर आल्या आहेत. पालकांकडून वारंवार तक्रारीदेखील केल्या जातात मात्र बसचालकांवर काहीही फरक पडत नसल्याचं वारंवार घडत असलेल्या या घटनांमधून समोर येत आहे. 


पालक संतापले...


मुलांबाबात होणाऱ्या अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे अनेकदा पालाकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय शाळांनादेखील या संदर्भातील माहिती देऊन त्यांच्याकडेही तक्रार नोंदवली आहे. मात्र तरीही असे प्रकार थांबायचं नाव घेत नाही आहे. यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sabhaji Bhide Tushar Gandhi : संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ; तुषार गांधींकडून डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल