Sabhaji Bhide Tushar Gandhi : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी महात्मा गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या विरोधात आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी (Tushar gandhi) आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुण्यातील (Pune) डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) संभाजी भिडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, अन्वर राजन हे त्यांच्यासोबत आहेत.


"तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कडक शब्दात सांगितलं आहे की या तक्रारीची दखल घेऊन तपास करु योग्य कारवाई करु. न्यायावर आमचा विश्वास आहे. मात्र त्यांचे पाय कोणी बांधून ठेवले आहेत का?, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. त्यामुळे न्यायालयाच्या दरवाज्यात जाण्यासाठीची पहिली पायरी तक्रार देऊन ओलांडली आहे," असं तुषार गांधी म्हणाले.


गांधी घराण्यातील स्त्रियांचा अपमान आणि बेआब्रू केली आहे. ही गांधी घराण्यातील सगळ्याच पिढ्यांची बेआब्रू आहे. त्यामुळे बेआब्रू करणे, महिलांचा अपमान करणे, लोकांच्या मनात अनेक गोष्टींबाबत भेदभाव निर्माण करणे, गुन्हेगारी स्वरुपाचा वक्तव्य करणे आणि संगनमताने अशाप्रकारे कृत्य करणे त्यासोबतच समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य या सगळ्या कलमांअंर्तगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार नोंदवण्यात आली आहे, असं सरकारी वकील असिम सरोदे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर म्हटलं आहे. एखाद्या ठिकाणी भाषण करायचं आणि त्याची चित्रफित करुन समाज माध्यमांवर टाकायचं. करोडो लोकांनी ही चित्रफित बघितली आहे ऐकली आहे त्यामुळे संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशा स्वरुपाची तक्रार डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले.


संभाजी भिडेंच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन


संभाजी भिडे विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, या मागणीसाठी विविध संघटना रस्त्यावर उतरले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यलयावर मोर्चा घेऊन आंदोलक निघाले आहेत. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात आंदोलनं (Protest) करण्यात आले. भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रसने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.


इतर महत्वाच्या बातम्या-