मुंबई : एसटी  कर्मचारी (ST Strike)  त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी 11  सप्टेंबरला ही संपाची हाक दिलीय. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत. जर सरकारने ऐकले नाही तर 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतहा निर्णय घेण्यात आलाय. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित  मागण्यांसाठी संपाची हात दिली आहे.  या बैठकीत करारातील तरतुदीनुसार सरकारने 42% महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात अशी मागणी  संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान गणपतीचा सण 19 सप्टेंबरला आहे. 11  सप्टेंबरला ही संपाची हाक दिलीय

 दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा. एसटीची धाववेळ (रनिंग टाईम) निश्चित करावी.तसेच वाहकांचे (कंडक्टर) बदली धोरण रद्द करावे, खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा. लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी 240 हजर दिवसांची अट रद्द करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा.अनेक विभागात 10-12 वर्षापासून कर्मचारी TTS आहेत त्यांना एकवेळची बाब म्हणून TS करण्यात यावे, जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

ऐन सणासुदीच्या काळात संपाची हाक

मागच्या वर्षी ऐन सणासुदीच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अनेक महिने हा संप चालल्याने राज्यातील नागरिकांचे हाल झाले. मोठ्या शिताफीने सरकारने हा संप मिटवण्यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या आणि आश्वासनं दिली होती. मात्र, अजूनही काही मागण्या आणि पगार रखडल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमद्धे नाराजी दिसून येत आहे. सरकारच्या या कारभारामुळे कामगारांत तीव्र नाराजी आहे. ऐन  सणासुदीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी  आपल्या न्याय-हक्कांसाठी  पुन्हा संपाचे हत्यार उपासले आहे.  

हे ही वाचा :

 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत! 17 लाख सरकारी-निमसरकारी कर्मचारीही उगारणार संपाचा बडगा