Santosh Bangar: बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी. त्यांना सांगा गाड्या करा, गाड्यांसाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करा, त्यांना सांगा येण्या-जाण्याचे जे काही लागते ते आम्हाला सांगा, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. मतदारांना पैशाचे अमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केल्याने निवडणूक आयोग आता यावर काय कार्यवाही करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. हिंगोलीच्या कळमनुरी येथे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख केली फिक्स
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बागर (Santosh Bangar) यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे. येत्या 24 तारखेला आमदार संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
संतोष बांगर हे सध्या शिवसेना शिंदे गटात
संतोष बांगर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. शिवसेनेते फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. ते सातत्यानं त्यांच्या वेगवेगळ्या वक्त्व्यांमुळं चर्चेत असतात. अशातच आता त्यांनी बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी फोन पे करण्याची भषा केली आहे. त्यामुळं सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. मतदारांना ाअमिष दाखवण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संतोष बांगर यांनी विजय मिळवला होता. त्यांनी 16हजार 123 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी कॉंग्रेसचे संतोष टारफे यांच्यावर विजय मिळवळा होता. संतोष बांगर हे कोणत्या ना कोणत्या मुद्यावरुन सतत चर्चेत असतात. ते सध्या शिवसेना शिंदे गटात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर संतोष बांगरे ठाकरेंच्या शिवसेनेत होते. मात्र, काही दिवसात लगेच संतोष बांगर आणि यांनी पलटी मारत शिवसेना शिंदे गटात प्रवेस केला. त्यामुळं मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संतोष बांगर यांनी पुन्हा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घो,णा केलवी आहे. तसेच येत्या 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल देखील करणार आहे.