पनवेलमध्ये टोईंग केलेल्या गाड्यांमधून पेट्रोलचोरी, मोबाइल कॅमेऱ्यात चोरी कैद
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2017 11:28 PM (IST)
पनवेल: वाहतूक पोलिसांकडून टोईंग केलेल्या वाहनांमधून पेट्रोलचोरी होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे टोईंग व्हॅनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच ही पेट्रोलचोरी होत होती. नवीन पनवेलमध्ये ही घटना आहे. नवीन पनवेलच्या उड्डाणपुलाखाली ठेवण्यात आलेल्या टोईंगच्या गाड्यांमधून पेट्रोल चोरी करण्यात येत होती. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित चोर हा टोईंग व्हॅनवर काम करणारा कर्मचारीच असल्याचं समोर आलं. त्यानंतर पेट्रोल चोरणाऱ्या त्या कामगाराला कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.