लातूर : लातूरमधील क्रीडा संकुलात 'सैराट'च्या टीमचा उद्या होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी फिरायला येणाऱ्यांनी तोडफोड केल्याची माहिती मिळते आहे. तोडफोड करणारे 'बाहेरचे लोक' होते, असे क्रीडा संकुलाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, हे बाहेरचे लोक कोण, हे कळू शकलेलं नाही. या कार्यक्रमाला 'सैराट' टीमसोबत 'चला हवा येऊ द्या'ची टीमही येणार होती.
लातूरमधील किल्लारी भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याआधी कार्यक्रमाच्या तिकिटांच्या विक्रीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने कार्यक्रम रद्द केला असल्याचं सांगण्यात येत होतं.
दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दयावरून जिल्हाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती समजते आहे. या कार्यक्रमाला आर्ची, परशासह सैराटची टीम येणार होती.
संबंधित बातमी : आर्ची-परश्याच्या कार्यक्रमाची तिकीटं खपेना, लातुरातील कार्यक्रम रद्द