मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्यानंतर अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात पेट्रोल साडे चार रुपयांपर्यंत, तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी कमी होणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी ग्राहकांना मात्र याचा प्रत्यक्ष फायदा चार ते साडे चार रुपयांनीच झाला आहे. लिटरमागे पूर्ण पाच रुपये कमी झालेले नाहीत.
राज्यात पेट्रोलवरील वॅटमध्ये अडीच रुपयांनी कपात करण्यात आलीय, मात्र डिझेलवरील वॅटमध्ये कपात करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी दीड रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनीही एक रुपयांचा दिलासा दिला. याप्रमाणे राज्यात पेट्रोलसाठी किमान पाच रुपये दिलासा मिळणं अपेक्षित आहे, पण पूर्ण पाच रुपयांचा फायदा ग्राहकांना मिळालेला नाही.
शहर कालचे दर आजचे दर एकूण कपात
मुंबई 91.34 87.04 4.30
औरंगाबाद 92.18 88.02 4.16
परभणी 92.94 88.73 4.21
नांदेड 92.94 88.60 4.34
अमरावती 92.60 88.23 4.37
पुणे 91.29 86.76 4.53
कोणत्या जिल्ह्यात काय दर?
मुंबई महानगर क्षेत्र
जिल्हा पेट्रोल दर डिझेल दर (प्रति लिटर)
पालघर 86.85 76.11
मुंबई उपनगर 87.04 77.51
मुंबई शहर 86.97 77.45
ठाणे 87.06 77.53
पश्चिम महाराष्ट्र
अहमदनगर 86.81 76.12
कोल्हापूर 87.14 76.45
पुणे 86.76 76.06
सांगली 86.88 76.20
सातारा 87.46 76.73
सोलापूर 88.02 78.07
मराठवाडा
औरंगाबाद 88.02 78.50
बीड 87.73 77.00
हिंगोली 87.75 77.04
जालना 87.89 77.15
लातूर 87.68 76.96
नांदेड 88.60 77.85
उस्मानाबाद 87.42 76.72
परभणी 88.73 77.95
विदर्भ
अकोला 86.99 76.31
अमरावती 88.23 78.73
भंडारा 87.46 76.76
बुलडाणा 87.41 76.71
चंद्रपूर 86.95 76.29
गडचिरोली 87.70 77.01
गोंदिया 88.04 77.31
नागपूर 87.45 77.97
वर्धा 87.17 76.48
वाशिम 87.46 76.77
यवतमाळ 88.00 77.28
कोकण
सिंधुदुर्ग 87.88 77.16
रायगड 87.00 76.26
रत्नागिरी 87.99 77.26
उत्तर महाराष्ट्र
धुळे 86.89 76.20
जळगाव 87.93 77.19
नंदुरबार 87.61 76.89
नाशिक 87.34 76.62
पाच रुपये कपातीची घोषणा, ग्राहकांना साडे चार रुपयांचाही फायदा नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2018 08:23 AM (IST)
पेट्रोलचे दर पाच रुपयांनी कमी होणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी ग्राहकांना मात्र याचा प्रत्यक्ष फायदा चार ते साडे चार रुपयांनीच झाला आहे. लिटरमागे पूर्ण पाच रुपये कमी झालेले नाहीत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -