मुंबई:  सलग 11 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं मोदी सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उमटताना दिसत आहे.

आज पुन्हा पेट्रोल 30 तर डिझेलचा दर लीटरमागे 20 पैशांनी वाढला आहे.  देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे.

अमरावतीतील पेट्रोलचा आजचा दर 86.52 रुपये तर डिझेल 74.11 रुपये आहे.

त्याखालोखाल सिंधुदुर्गात पेट्रोल 86.31 रुपये तर डिझेल 72.89 रुपये प्रति लिटर आहे.

तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 86.23 रुपये तर डिझेल 73.91 रुपये आहे.

मुंबईत वाढलेल्या दरानुसार पेट्रोलचे दर 85.29 इतके झाले आहेत. तर डिझेल 72.96 रुपये प्रति लिटर मिळत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच राहणार : केंद्र सरकार  

                पेट्रोल                    डिझेल      

मुंबई -          85.29              72.96

अमरावती      86.52              74.15

औरंगाबाद     86.23              73.91

नवी मुंबई       85.35             73.02

पुणे               85.01             71.58

अकोला         85.57              72.08

नाशिक         85.95               72.52

सोलापूर -      86.14              73.84

 पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?   

कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील 8 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

इंधन दरवाढ होणारच : केंद्र सरकार

देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता मावळली आहे. सोईसुविधांसाठी दरवाढ होतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.

वाढत्या इंधन दरवाढीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिलासा तर नाहीच पण पेट्रोल दरवाढीबाबत मोठा झटका बसला आहे.

मोदी सरकारच्या काळात इंधन सर्वात महाग
दिल्लीत आज पेट्रोल 77 रुपये 47 पैशांवर आहे.  दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे जे दर आहेत, ते भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही नव्हते. मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलने 14 सप्टेंबर 2013 रोजी सर्वाधिक 76.6 रुपयांचा दर गाठला होता.

संबंधित बातम्या

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच राहणार : केंद्र सरकार  

पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?   

 ... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल  

 पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला!