मुंबई : मुंबई, पुण्यासह राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. पेट्रोल आज 11 पैशांनी तर डिझेल पाच पैशांनी महागलं आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेली ही दरवाढीची मालिका कायम आहे. लवकरच पेट्रोल शंभरी गाठण्याची भीती सर्वसामान्यांना सतावत आहे.
आयओसीएलच्या वेबसाईटनुसार, राज्यभरातील दोन जिल्हे वगळता सगळकडे पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. तर डिझेलही 80 रुपयांच्या जवळ आहे. एकाच जिल्ह्यामध्ये काही पैशांच्या फरकाने दर वेगवेगळे असू शकतात, पण हे दर नव्वद रुपयांच्या पुढेच आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक महाग पेट्रोल
देशातलं सर्वाधिक महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळतं. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर 39 टक्के (+कर) वॅट वसूल केला जातो. यामध्ये विविध प्रकारच्या करांचा समावेश आहे.
दुष्काळी कर तीन रुपये, महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन तीन रुपये, शिक्षण कर एक रुपया, स्वच्छ भारत अभियानचा एक रुपया, कृषी कल्याण अभियान एक रुपया असा एकूण नऊ रुपये कर आकारला जातोय.
सुप्रीम कोर्टाने महामार्गांलगतच्या दारु विक्रीवर बंदी आणली होती. त्यानंतर राज्य सरकारने महसुलात घट झाल्याचं कारण देत पेट्रोल आणि डिझेलवर तब्बल तीन रुपये कर आकारणी सुरु केली. काही काळाने दारु विक्रीही सुरु झाली, पण कर कायम आहे. तर 2014-15 सालच्या दुष्काळात आकारलेला तीन रुपये करही अजून कमी केलेला नाही.
कोणत्या जिल्ह्यात काय दर?
मराठवाडा
जिल्हा पेट्रोल दर डिझेल दर (प्रति लिटर)
औरंगाबाद 91.13 79.64
बीड 90.82 78.11
हिंगोली 90.85 78.15
जालना 90.89 78.17
लातूर 90.77 77.07
नांदेड 91.65 78.91
उस्मानाबाद 90.47 77.78
परभणी 91.82 79.06
पश्चिम महाराष्ट्र
अहमदनगर 89.95 77.27
कोल्हापूर 90.24 77.56
पुणे 90.89 78.19
सांगली 89.97 77.30
सातारा 90.56 77.84
सोलापूर 91.13 79.20
विदर्भ
अकोला 90.08 77.42
अमरावती 91.33 79.87
भंडारा 90.86 78.16
बुलडाणा 91.20 78.47
चंद्रपूर 90.05 77.40
गडचिरोली 90.79 78.11
गोंदिया 91.13 78.42
नागपूर 90.56 79.11
वर्धा 90.27 77.59
वाशिम 90.56 77.88
यवतमाळ 91.08 78.37
कोकण
सिंधुदुर्ग 90.97 78.26
रायगड 90.10 77.37
रत्नागिरी 91.08 78.37
मुंबई महानगर क्षेत्र
पालघर 90.23 77.49
मुंबई उपनगर 90.15 78.65
मुंबई शहर 90.08 78.58
ठाणे 90.16 78.67
उत्तर महाराष्ट्र
धुळे 90.01 77.23
जळगाव 91.03 78.30
नंदुरबार 90.75 78.04
नाशिक 90.44 77.73
दरवाढ सुरुच, मुंबई, पुण्यासह 34 जिल्ह्यात पेट्रोलची नव्वदी पार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Sep 2018 08:13 AM (IST)
पेट्रोल लवकरच शंभरी गाठतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील 36 पैकी 34 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. सांगली आणि अहमदनगरमध्ये पेट्रोल अजून नव्वद रुपये प्रति लिटरच्या आत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -