मुंबई : कुटुंबातील सदस्यांनी केलेलं अनधिकृत बांधकामही ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकांच्या अंगलट येणार आहे. अशा लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे. नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका किंवा ग्रामपंचायत सदस्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
कुटुंबीयांनी अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण केलं, तरी ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकाचं पद रद्द होणार आहे. नगरसेवकाची मुलं किंवा वडिल यांनी या नियमाचं उल्लंघन केलं, तरी नगरसेवकावर पद रद्द करण्याची कारवाई होणार आहे. ग्रामपंचायत सदस्य जनाबाई यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
यापूर्वी केवळ नगरसेवकालाच हा नियम लागू होता. नगरसेवकाच्या कुटुंबीयांचा यामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकाचे कुटुंबीयही या नियमाच्या कक्षेत येतील.
कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्यास ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकांचे पद रद्द
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2018 11:55 PM (IST)
नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका किंवा ग्रामपंचायत सदस्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -