Nagpur News नागपूर : अलीकडच्या काळात वर्तमान पत्रात आलेल्या बातम्या मी वाचल्या आणि मला त्याचे दुःख झाले आहे. माझं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेतलंय. मात्र, मी कुठल्याही शासकीय योजनेला चॅलेंज किंवा विरोध केला नाहीत. मी आजच्या पिटीशनमध्ये जनतेचा पैसा योग्यरीतीने वापर करण्यात यावा, याचा उल्लेख त्यात आहे. योजनांचा माध्यमातून गरिबीचा फायदा होत असेल तर चांगले आहे.


असे असताना मी काँग्रेसचा (Congress) कार्यकर्ता आहे, काँग्रेसच्या कार्यकाळातही मी याचिका टाकल्या आहेत. सध्या या याचिकेला राजकीय वळण मिळाले हे उघड आहे. मात्र मी कुठल्या पक्षाच्या माध्यमातून याचिका केली नाही. किंबहुना मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. पण याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. अशी स्पष्टोक्ती लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिकाकर्ते अनिल वाडपल्लीवार (Anil Wadpalliwar)यांनी दिली आहे. ते नागपूर येथे बोलत होते.


सरकारच्या कोणाच्याही योजनेला विरोध किंवा चॅलेंज केलं नाही


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच भाष्य करत म्हणाले होते कि, काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांमार्फत न्यायालयात याचिका टाकली आणि काँग्रेसला लाडकी बहीण योजनेचा विरोध आहे. तर मुख्यमंत्री देखील हेच बोलले कि विरोधकांना लाडकी बहीण योजनेचं यश पचवता येत नाहीये. मात्र हा सत्ताधाऱ्यांचा गैरसमज असल्याचेही अनिल वडपल्लीवार म्हणाले. याप्रकरणी 18 तारखेला सुनावणी आहे. आमच्या याचिकेत कोणाच्याही योजनेला विरोध किंवा चॅलेंज केलं नाही.  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे, त्यांनी अभ्यास करून बोलावे. त्यांचा गैरसमज झाला असून याचिकेत सत्ताधार्यांचा कुठलाही उल्लेख नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार विकास ठाकरेंच्या निवडणुकीत मी निवडणुक प्रतिनिधी होतो. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, पण याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचेही  अनिल वडपल्लीवार म्हणाले.


हे हफ्ते घेणारे नाही तर हफ्ते देणारे सरकार आहे- एकनाथ शिंदे 


महायुती सरकार ही योजना बंद होऊ देणार नाही आणि ही योजना कदापी बंद होऊ शकणार नाही. आधी विरोधक म्हणत होते, खात्यात पैसे येणार नाही. आता आले तर ते म्हणत आहेत लवकर काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढून घेईल. आधीचे सरकार हप्ते घेणारे सरकार होतं, मात्र हे सरकार देणारे आहे, हे हफ्ते घेणारे नाही तर  हफ्ते भरणारे सरकार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर घणाघात  केला आहे. 


हे ही वाचा