PCMC News :  पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरणातील (PCMC News ) मूकबधिर शाळेजवळील (Pimpri-chinchwad) मोकळ्या जागेत एक ज्येष्ठ (senior citizen ) नागरिक व्यक्ती चिखलामध्ये (Mud) फसल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. संबधित व्यक्ती शॉर्ट कट मारून जात होते. मात्र शॉर्ट कट मारणे त्यांना भलतंच महागात पडले आहे. रस्त्यावरून जात असताना हे व्यक्ती चिखलात फसले आणि प्रयत्न करुनही बाहेर न निघता आल्याने अखेर अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) त्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली.


नीळकंठ पाटील (Nilkantha Patil), असे या बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून निगडी (Nigdi area) परिसरात हा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, निगडी परिसरात असणाऱ्या एका मूक बधीर शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या जागेत एक व्यक्ती चालत असताना  चिखलात फसले. गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने या भागात दलदल झाली आहे. मात्र ही दलदल संबधित व्यक्तीच्या लक्षात न आल्याने हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. 


पाटील हे चिखलात फसले असल्याचं जवळून जाणाऱ्या नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाच्या जवानांना या संदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी दोर, शिडी आणि हुक याचा वापर करून संबधित व्यक्तीला बाहेर काढले. पिंपरी चिंचवड शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी घटना घडत आहेत. काल सकाळच्या सुमारास रस्ता खचला आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम कोसळले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. आज सकाळी हे व्यक्ती चिखलात फसले. घटना लवकर लक्षात आल्याने त्यांना वेळेत मदत मिळाली आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.


नागरिकांनो पावसाळा सुरुय काळजी घ्या...

पुणे आणि पुण्यातील आजूबाजुच्या परिसरात मागील काही दिवस झाले मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक मोकळ्या परिसरात चिखल साचलं आहे. याच चिखलात अनेकदा फसायची भीती असते. त्यामुळे रस्त्याने चालताना काळजी घेण्याची गरज आहे. पावसामुळे आणि चिखलामुळे रस्तेदेखील निसरडे झाले आहेत. त्यामुळे गाडी चालवतानादेखील काळजी घेण्याची गरज आहे. 


महत्वाची बातमी-


Landslide News : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पुण्यातील पसारवाडीने रात्र काढली जागून; सरकार पुनर्वसन करत नसल्यानं अख्ख्या गावाचा जीव टांगणीला