रत्नागिरी: गणेशोत्सव आटोपून परतताना रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांना वेठीस धरल्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समोर आला आहे.


 

दक्षिणेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे या आधीपासूनच फुल्ल होऊन येत आहेत, शिवाय त्या गाड्यांचे दरवाजे उघडले जात नसल्यानं अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यात रेल्वे पोलिसांनी कोणतेही नियोजन केले नसल्यानं खोळंब्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे नक्की कोकण रेल्वे आहे कुणासाठी? असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

 

फक्त रत्नागिरीच नाही, तर चिपळूण, खेड आणि संगमेश्वर स्थानकातही देखील अशीच परिस्थिती असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोकणवासियांसाठी धावणारी रेल्वे जर त्यांच्याच कामी येत नसेल, तर तिचा काय उपयोग असा सवाल प्रवासी विचारत आहेत.