संजय राऊतांच्या उपस्थितीत सुभाष वेलिंगकरांची पणजीत बैठक
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2016 11:23 AM (IST)
पणजी (गोवा) : गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर आणि संजय राऊत यांच्यात काल गोव्यात बैठक झाली. सुमारे दोन तास दोघांमध्ये खासगीत चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांच्यावर पक्षानं गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यादृष्टीनं पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी शिवसेनेनं आतापासूनच संघातल्या आणि भाजपमधल्या नाराज गटाला आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गोव्यात वेलिंगकर यांनी आरएसएसमधून बाहेर पडत गोवा प्रांताचा स्वतंत्र संघ स्थापन केला आहे. पणजीत राऊत यांनी प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाखाली सुभाष वेलिंगकरांची जाहीर सभा पार पडली. या बैठकीत भाजपला निवडणुकीत पराभूत करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी संघाचा बॅनर लावण्यात आला. या सभेला 2 हजार लोक उपस्थित होते.