मुंबई : मुंबईतील बोरिवली स्टेशनवर धावत ट्रेन पकडणाऱ्या तरुणाचा ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार मंगळवारी 3 जुलै रोजी घडला आहे. तसंच हा सर्व थरार सीसीटीव्हीतही कैद झाला.


मूळचा अहमदाबादचा महेश आत्रा 3 जुलै रोजी गुजरात मेलनं प्रवास करत होता. मात्र पिण्याचं पाणी घेण्यासाठी तो बोरिवली स्टेशनमध्ये उतरला होता. त्यानं पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी दुकानदाराला 100 रुपयांची नोट दिली. मात्र ट्रेन सुटल्याचं लक्षात येताच त्यानं धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. एका हातात पाण्याची बाटली आणि दुसऱ्या हातात सुट्टे पैसे असल्यानं त्याचा तोल जाऊन तो रेल्वेखाली आला.

ट्रेनखाली येण्यापूर्वी काही मीटर्सपर्यंत तो फरफटत ओढला गेला. यात त्याला गंभीर जखमा झाल्या ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. तातडीनं रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रवाशाचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान गेल्या काही दिवसात रेल्वेखाली येऊन होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.

पाहा व्हिडिओ :